करमाळा तालुका 'विज्ञान महोत्सवाचे' 22 डिसेंबरला आयोजन - नागरिकांनी 'विज्ञान महोत्सवास' उपस्थित रहावे - गटविकास अधिकारी मनोज राऊत.. - Saptahik Sandesh

करमाळा तालुका ‘विज्ञान महोत्सवाचे’ 22 डिसेंबरला आयोजन – नागरिकांनी ‘विज्ञान महोत्सवास’ उपस्थित रहावे – गटविकास अधिकारी मनोज राऊत..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : करमाळा पंचायत समितीच्यावतीने करमाळा तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये सायन्स वॉल हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला होता, या उपक्रमाच्या वर्षपुर्तीनिमित्त पंचायत समिती करमाळा व यशकल्याणी सेवाभावी संस्था, यांचे संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यामध्ये शालेय जीवनातच वैज्ञानिक जाणीव जागृती निर्मितीसाठी थोर गणिती तज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या दि. 22 डिसेंबर 2022 रोजी असलेल्या जयंती निमित्ताने या गटातील प्रत्येक केंद्रात करमाळा तालुका विज्ञान महोत्सव अंतर्गत विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे, तरी या विज्ञान प्रदर्शनास तालुक्यातील नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी केले आहे.

या प्रदर्शनाचे उद्घाटन करमाळा तालुक्यातील मान्यवर अधिकारी वर्ग यांचे हस्ते होणार असून, विज्ञान प्रदर्शनामध्ये ग्रामीण भागातील सर्व जिल्हा परिषदेच्या प्राथमिक, माध्यमिक व स्वयं अर्थ सहाय्यिता शाळेतील विदयार्थी स्पर्धक म्हणून सहभागी असणार आहे. सदर प्रदर्शन हे सर्व विदयार्थी व ग्रामस्थांना पाहणेसाठी खुले असेल. यशकल्याणी ग्रामीण सेवाभावी संस्था, करमाळा गणेशभाऊ करे-पाटील यांचेवतीने उत्कृष्ठ वैज्ञानिक उपकरण, साहित्यनिर्मिती व सादरीकरणासाठी प्रत्येक गटातील प्रथम 3 क्रमांकाच्या स्पर्धकांना रोख स्वरुपात बक्षीस व प्रमाणपत्र देवून यथाचितरित्या गौरविण्यात येणार आहे.

विज प्रदर्शन बक्षीस वितरण कार्यक्रम परम संगणकाचे जनक व जेष्ठ वैज्ञानिक डॉ. विजय भटकर यांचे हस्ते यशकल्याणी भवन, करमाळा येथे करण्यात येणार आहे. सदर स्पर्धेसाठी इयत्ता 2 री ते 5 वी व 6 वी ते 8 / 10 वी असे दोन गट असतील. विज्ञान प्रदर्शनात सहभागी होणाऱ्या सर्व विदयार्थ्यांना सहभागावद्दल प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

तसेच केंद्रस्तरावर उत्कृष्ठपणे विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केलेल्या प्रथम 5 केंद्रप्रमुख यांचा प्रमाणपत्र व मेडल देऊन यथोचितरित्या सन्मान करण्यात येणार आहे. अशी माहिती पंचायत समितीचे गटशिक्षणाधीकारी राजकुमार पाटील यांनी दिली आहे. या विज्ञान महोत्सवात जास्तीत जास्त विदयार्थ्यांनी सहभाग नोंदवावा व तालुक्यातील सर्व नागरिकांनी विज्ञान महोत्सवास उपस्थित राहून विदयार्थ्यांना प्रोत्साहन दयावे असे आवाहन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी केले आहे.

करमाळा तालुक्यातील विज्ञान प्रदर्शन व त्याचे ठिकाण..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!