कलिम काझी यांचा भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम फाउंडेशनवतीने सत्कार संपन्न..

0

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : करमाळा अर्बन बँकेचे संचालकपदी करमाळा कलिम काझी यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम फाउंडेशन करमाळा व करमाळा मुस्लिम समाज यांच्यावतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी काझी यांनी बोलताना सांगितले की, करमाळा अर्बन बँकेचे मार्फत गेल्या पंचवार्षिक संचालकपदाच्या कार्यकाळात अनेक युवकांना कोरोना काळानंतर आलेली आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी स्वयं रोजगार चालू करण्यासाठी , उद्योग धंदे सुरू करण्यासाठी बँकेचे मार्फत कर्ज उपलब्ध करून दिली आहेत . युवकांनी आपल्याकडे असणारे कौशल्य गुणांचा वापर करून किंवा पाच ते दहा युवकांनी एकत्र येऊन नवीन उद्योग धंदे सुरु करावे त्यासाठी लागणारे भांडवल हे करमाळा अर्बन बँक व बँकेचे अध्यक्ष कन्हैयालाल देवी यांच्या मार्फत शंभर टक्के सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. असेही त्यांनी म्हटले आहे.

यावेळी समीर शेख, पिंटुशेठ बेग, जामा मस्जिद चे विश्वत जमिर भाई सय्यद, सुरज शेख,जहाँगीर बेग, फिरोज बेग,आझाद शेख, ईमत्याज पठाण, मुस्तकीम पठाण, इक्बाल शेख,व मुस्लिम समाजातील युवक यांच्या उपस्थितीत संपन्न झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!