शासकीय कामकाजात अडथळा - चौघावर गुन्हा दाखल.. - Saptahik Sandesh

शासकीय कामकाजात अडथळा – चौघावर गुन्हा दाखल..

करमाळा / संदेश प्रतिनिधी

करमाळा : अडविलेला रस्ता खुला करून देण्यासाठी आलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना विरोध करून शासकीय कामकाजात अडथळा केल्याप्रकरणी चौघां विरूध्द करमाळा पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे. हा गुन्हा न्यायालयाच्या आदेशानूसार नोंदण्यात आला आहे. यात रूक्मीणीबाई मनोहर गुरव (रा. शेटफळ) यांनी फिर्याद दिली आहे.

त्यात त्यांनी म्हटले आहे, की आडविलेला रस्ता खुला करण्याकामी तहसीलदाराने हुकूम दिल्यानंतर तलाठी, मंडल अधिकारी व दोन कॉन्स्टेबल ९ मार्च २०२१ रोजी शेटफळ येथे आले असता, त्यांना शासकीय कामकाज करण्याकामी हरिभाऊ धर्मा कांबळे, शालन हरिभाऊ कांबळे, मनोज हरिभाऊ कांबळे व अनिल हरिभाऊ कांबळे यांनी विरोध केला व काम होऊ दिले नाही. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी तक्रार दिली नाही. त्यामुळे या फिर्यादी महिलेने स्वत: न्यायालयात तक्रार दिली असून, न्यायालया च्या आदेशानूसार चौघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!