मराठा आरक्षण तापले - तालुक्यात एक बस जाळली तर दोन बसवर दगडफेक - Saptahik Sandesh

मराठा आरक्षण तापले – तालुक्यात एक बस जाळली तर दोन बसवर दगडफेक

करमाळा / संदेश प्रतिनिधी

करमाळा : राज्यात मराठा आरक्षणाचे आंदोलन सुरू असताना करमाळा तालुक्यात त्याची तीव्रता वाढली आहे. काल एका दिवसात तीन बसचे नुकसान करण्यात आले. त्यापैकी एक बस पूर्ण जळून ५० लाखाचे नुकसान झाले आहे. तर फिसरे येथे टायर पेटवून रस्ता बंद करण्यात आला होता. या प्रकरणी पोलीसात चार गुन्हे दाखल झाले आहेत.

काल (ता. ३०) रात्री दहा वाजता आदिनाथ कारखान्याच्या जवळ भाळवणी फाट्याजवळ सोलापूर-नाशिक एसटी बस क्र.एमएच १४ केक्यु २७०२ ही २० ते २५ अनोळखी व्यक्तींनी आडवून प्रवाशांना उतरवून डिझेल, पेट्रोल व कडबा टाकून बस पेटवली. त्यात ५० लाख किंमतीच्या बसचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी बसचालक अनिल भागवत सिरसट (रा.खुनेश्वर, ता. मोहोळ) यांनी फिर्याद दिली आहे.

दुपारी सव्वातीन वाजता नगर डेपोच्या नगर- पंढरपूर या बसवर दगडफेक करण्यात आली आहे. यावेळी बसचे दहा हजार रूपयाचे नुकसान झाले असून बसचा चालक तात्याभाऊ रघुनाथ नरवडे रा. टाकळी हादगाव यांनी फिर्याद दिली आहे.

कालच (ता. ३०) रात्री सव्वादहाच्या सुमारास अहमदनगरहून पंढरपूरकडे करमाळा मार्गे जात असलेल्या बसवर मांगी टोलनाक्या जवळ मोटारसायकलवर आलेल्या दोघांनी दगड फेकून काच फोडून चार हजार रूपयाचे नुकसान केले आहे. फिसरे बसस्थानकासमोर जुने टायर पेटवून रस्ता आडविण्याचा प्रयत्न झाला आहे. हा प्रकार काल (ता. ३०) रात्री साडेआठ वाजता घडला आहे. या प्रकरणी पोलीस हवालदार मंगेश पवार यांनी फिसरे येथील तिघातरूणांविरूध्द फिर्याद दिली आहे.

संबंधीत न्यूज – करमाळ्यात ‘मराठा समाजाच्या’ आरक्षणासाठी सकल मराठा समाजाच्यावतीने ‘जेलभरो आंदोलन’

‘मराठा समजाला आरक्षण’ मिळण्यासाठी तालुक्यातील ५० गावात नेत्यांना प्रवेश बंदी – करमाळा तहसीलमध्ये साखळी उपोषण सुरू

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!