दौंड-कलबुर्गी शटल सुरू करून केम स्टेशनवर थांबा मिळावा – केम ग्रामपंचायतीचे रेल्वे विभागाला निवेदन
केम (प्रतिनिधी/ संजय जाधव) : दौंड-सोलापूर- कलबुर्गी- दौंड (शटल) ही प्रस्ताविक रेल्वे सुरू करून या गाडिला केम येथे थांबा मिळावा अशी मागणी केम ग्रामपंचायतीच्या वतीने एका लेखी निवेदनाद्वारे सोलापूर रेल्वे विभागाचे रेल प्रबंधक यांच्या कडे केली आहे.
दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे कि, रेल्वेचे दुहेरीकरण झाल्यानंतर व कोविड नंतर मार्च २०२०पासून कुर्डूवाडी, सोलापूर ला जाण्यासाठी पूर्वींचा थांबा असणाऱ्या मुंबई. चेन्नई मेल ही गाडि सुपरफास्ट करून तिचा केम येथील थांबा रद्द केला आहे. त्यामुळे सोलापूर कडे जाणारी सकाळी रेल्वे नसल्याने महाविद्यालयीन शिक्षण घेणारे विदयार्थांचे शैक्षणीक नुकसान होत आहे तसेच प्रवासी, रूग्ण, पासधारक, व्यापारी यांची गैर सोय होत आहे आता सोलापूर ला जायचे म्हटले तर टेंभुर्णी हून सोलापूर ला एसटिने प्रवास करावा लागतो या साठी वेळ हि वाया जाऊन तिकट भाडे हि दुप्पट लागते त्यामुळे सोलापूर ला शिक्षण घेणाऱे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
पूर्वीच्या वेळेत अर्थात ही गाडी दौंड मधून सकाळी पाच वाजता शटल सोडल्यास ती केमला ६:४५ला व कुर्डूवाडी ७:१५ला पोहचेल व सोलापूर ला ८:३०वा पोहचेल त्यामुळे विद्यार्थी,प्रवासी,पासधारक व्यापारी, रुग्ण यांच्या सोयीचे होणार आहे. या गाडिला भिगवण,पारेवाडी, जेऊर,केम,माढा,मोहोळ,येथे थांबे मिळावे यामुळें रेल्वे विभागाला कलेक्शन वाढणार आहे तरी या मागणीचा विचार करावा अशी मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनाची प्रत माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्या कडे देण्यात आली आहे.