स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त करमाळा येथे २३ जानेवारीला रक्तदान शिबिर आयोजित

केम (प्रतिनिधी/ संजय जाधव) : शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या २३ जानेवारी रोजी असलेल्या जयंतीनिमित्त करमाळा शहरात शिवसेना- युवा सेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले असून “जय महाराष्ट्र चौक” या ठिकाणी सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत हे शिबिर होणार आहे.
हे शिबीर शिवसेना संपर्क प्रमुख अनिल कोकीळ, सह संपर्क प्रमुख साईनाथ अभंगराव,युवासेना जिल्हा विस्तारक उत्तमजी आयवळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केले जाणार आहे.
या शिबिरास शिवसेना जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे, महिला आघाडी जिल्हा संघटिका आशा टोनपे,युवासेना जिल्हाप्रमुख सचिन बागल, युवती सेना जिल्हाप्रमुख साक्षी भिसे हे उपस्थित रहाणार असुन या रक्तदान शिबिरात जास्तीत जास्त शिवसैनिक युवासैनिक व नागरिकांनी सहभाग घेऊन रक्तदान करावे असे आवाहन युवासेना सोशेल मिडीया प्रसिद्धी प्रमुख अजय साखरे यांनी केले आहे.
रक्तदान शिबिरासाठी आयोजित बैठकीत अजय साखरे बोलत होते. यावेळी ते म्हणाले की “शिवसेनाप्रमुख स्व बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात ऐंशी टक्के समाजकारण विस टक्के राजकारण” हे ब्रीद वाक्य समोर ठेवून राजकारण केले. त्यामुळेच त्यांनी घालून दिलेल्या आदर्शानुसार, विचारानुसार वाढते अपघात, व गरोदरपणात महिलांना लागणाऱ्या रक्ताची गरज पाहता सामाजिक बांधिलकीतून रक्तदाना सारखा पवित्र उपक्रम राबवून स्व बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस अभिवादन करणार आहोत.तरी पक्ष गट तट न पाहता जास्तीत जास्त संख्येने रक्तदान करून शिवसेना प्रमुख स्व बाळासाहेब ठाकरे यांना अनोखे अभिवादन करावे असे साखरे यांनी म्हटले आहे.
या वेळेस शिवसेना तालुकाप्रमुख सुधाकरकाका लावंड ,शहरप्रमुख प्रवीण कटारिया ,शिवसेना संघटक संजय शिंदे ,माजी तालुकाप्रमुख शाहुराव फरतडे, उपतालुकाप्रमुख श्रीहरी तळेकर, महिला आघाडी तालुकाप्रमुख वर्षाताई चव्हाण, युवासेना जिल्हा समन्वयक सागर तळेकर, उपजिल्हाप्रमुख मयुर यादव, जिल्ह चिटणीस आदेश बागल, तालुका प्रमुख शंभूराजे फरतडे ,शहरप्रमुख समीर परदेसी, युवती सेना तालुकाप्रमुख वैष्णवी साखरे, उपतालुकाप्रमुख समाधान यादव, तालुका चिटणीस पांडुरंग ढाणे, शहर समन्वयक प्रसाद निंबाळकर,शिवसेना उपशहर प्रमुख पंकज परदेशी, संतोष भालेराव, उमेश पवार, संतोष गानबोटे, लालू कुरेशी ,युवासेना उपशहरप्रमुख कल्पेश राक्षे, काॅलेज कक्ष तालुकाप्रमुख दर्शन कुस्कर, दिवेगव्हाण युवासेना शाखा प्रमुख अभिषेक मोरे,माजी उपसरपंच जोतीराम घाडगे, अविनाश गाडे,आदि उपस्थित होते.