करमाळा शहरातील दिपक राखुंडे यांचे निधन.. - Saptahik Sandesh

करमाळा शहरातील दिपक राखुंडे यांचे निधन..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा (ता.18) : करमाळा शहरातील कानाडगल्ली येथील रहिवासी दिपक अरुण राखुंडे, (वय ३७) यांचे अल्पआजाराने आज (ता.१८) पहाटे निधन झाले.

त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई-वडील, विवाहित बहिण असा परिवार आहे, दिपक राखुंडे हे हरहुन्नरी कलाकार होते, राजकीय नेत्यांचे डायलॉग बोलण्यासाठी ते प्रसिद्ध होते, तसेच सर्वांना प्रेमळ व आदराने बोलत असल्याने करमाळा शहरात ते चांगल्या परिचयाचे होते, ‘साप्ताहिक संदेश’ कार्यालयात त्यांनी काही वर्ष वृत्तपत्राचे कामकाज केले. त्यांच्या अचानक जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्यावर आज (ता.१८) करमाळा शहरातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!