केम येथील रेल्वे सेवा थांबे पूर्ववत करण्यात यावे - सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी दिले निवेदन - Saptahik Sandesh

केम येथील रेल्वे सेवा थांबे पूर्ववत करण्यात यावे – सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी दिले निवेदन

केम ( प्रतिनिधी – संजय जाधव) : केम येथील प्रवासी संघटनेचे पदाधिकारी व सर्वपक्षीय कार्यकर्ते यांनी काल (दि. ११ ऑगस्ट) रोजी रेल्वे विभागाचे डी. आर.एम.सो. सोलापूर यांना विविध मागण्यांसाठी निवेदने दिले.

या विविध निवेदनाचे विषय खालील प्रमाणे होते –
1) केम रेल्वे सेवा थांबे कोविडचे निर्बंध हटवून पूर्ववत करणे बाबत.
2 ) सोलापूर रेल्वे मंडल डी आर एम साठी जो कोविड निर्बंध आहे तो हटवून पूर्ववत रेल्वे सेवा सुरू होणेबाबत…
3 ) केम येथील रेल्वे स्थानकासाठी स्पेशल रेल्वे थांबा डबलिंग नंतर मिळण्यात यावा…
4 ) पूर्ववत थांबा मिळेपर्यंत सोलापूर डी आर एम व जी एम मध्य रेल्वे यांच्या स्तरावरून स्पेशल डेमो शाळेतील विद्यार्थी… नोकरवर्ग…कर्मचारी… तसेच आरोग्य सेवेच्या दृष्टीने जाण्या येण्यासाठी दौंड – सोलापूर व सोलापूर – दौंड स्पेशल डेमो केम स्थानकासाठी सुरू करावी…

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, केम(ता. करमाळा) हे गाव तालुक्यात सर्वात मोठे गाव आहे केम गावाच्या आजूबाजूस असणारी दहा ते बारा गावे ही या गावावर अवलंबून आहेत कोविडच्या महामारीमुळे सर्व प्रवासी रेल्वे सेवा बंद करण्यात आल्या होत्या आता सर्व रेल्वे सेवा सुरू करण्यात आल्या परंतु या केम गावामध्ये कोरोना काळापूर्वी हैदराबाद – मुंबई… मुंबई – हैदराबाद…चेन्नई – मुंबई एक्सप्रेस… मुंबई – चेन्नई एक्सप्रेस…साईनगर शिर्डी…या सर्व रेल्वे गाड्यांचा केम रेल्वे स्थानकावर थांबा होता परंतु कोणतीही पूर्व सूचना न देता थांबा बंद करण्यात आला

केम हे मध्य रेल्वे मार्गावरील महत्वाचे स्थानक असून करमाळा तालुका व पंचक्रोशीतील मोठी बाजारपेठ अजून प्रसिद्ध आहे येथे जगप्रसिद्ध सौभाग्याचे लेणे आहे गावात 30 ते 35 कुंकू कारखाने आहेत हे कुंकू भारतामध्ये रेल्वेने सर्वत्र पाठवले जाते परंतु रेल्वे विभागाने पार्सल ऑफिस व तिकीट बुकिंग सेवा बंद केले आहेत या गावात मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे… माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आहेत त्यामुळे पुणे…मुंबई ..सोलापूर.. पंढरपूर.. शिर्डी व तिरुपती बालाजी या ठिकाणी प्रवास करणारे विद्यार्थी… कामगार… नोकरवर्ग… शेतकरी वर्ग… कुंकू कारखानदार…देवदर्शनाला जाणारे वारकरी… व अनेक ज्येष्ठ मंडळी यांची रेल्वे थांबा नसल्याने गैरसोय होत आहे

गावातील अनेक व्यवसाय धंदे बंद पडले आहेत व ग्रामीण भागातील मुले मुली येण्या जाण्याची सोय नसल्याने पुढील शिक्षणापासून वंचित राहत आहेत केम व आजूबाजूच्या गावातील नागरिकांनी 10 ते 15 वर्ष पाठपुरावा करून नागरिकांनी रेल्वे थांबण्यासाठी वर्गणी गोळा करून सहा ते सात महिने तिकिटे काढली होती त्या पाठपुराव्यामुळे या सर्व गाड्यांना रेल्वे प्रशासनाकडून कायमस्वरूपी थांबा मिळाल्याचे पत्र रेल्वे प्रशासनाकडून प्रवासी संघटनेला मिळाले होते रेल्वे प्रशासनाकडून कोरोना काळानंतर सर्व रेल्वे गाड्या सुरळीत चालू करण्यात आल्या वेळोवेळी गावातील अनेक नागरिकांनी व प्रवासी संघटनेने अनेक वेळा रेल्वे प्रशासनाकडे पत्र व्यवहार करूनही या गाड्यांचा केम स्थानकाला थांबा मिळाला नाही या गावातील लोकांचे व आजूबाजूच्या पंचक्रोशीतील व्यापारी वर्गाचे रेल्वे थांबा नसल्यामुळे उद्योगधंदे बंद पडले आहेत बेरोजगार होऊन नुकसान होत आहे सुविधा बंद झाल्याने सर्व गंभीर बाबीचा विचार करून आपल्या स्तरावरून पाठपुरावा करून केम स्थानकावर या सर्व रेल्वे गाड्यांना कायमस्वरूपी थांबा मिळावा.

यावेळी निवेदन देताना केम रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष विजयकुमार ओहोळ उपाध्यक्ष संदीप भाऊ तळेकर सचिव सागरराज तळेकर सिराज मोमीन व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सागर राजे दौंड खजिनदार महादेव पाटमास केम गावचे माजी सरपंच अजित दादा तळेकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, ए.पी. ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष अच्युत काका पाटील, मार्केट सदस्य महावीर आबा तळेकर, चेअरमन आनंद शिंदे, भाजप तालुका सरचिटणीस धनंजय ताकमोगे, केम ग्रामपंचायत सदस्य अनंता तळेकर, सचिन रणशिंगारे, धनंजय घाडगे, प्रहार संपर्कप्रमुख सागर पवार, संतोष पाटील, तसेच सोलापूर प्रहार चे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ मस्के पाटील, सोलापूर शहराध्यक्ष अजित भाऊ कुलकर्णी, संपर्कप्रमुख जमीर भाई शेख, कार्याध्यक्ष खालीद भाई मणियार , युवा जिल्हाध्यक्ष मोहसीन भाई, तांबोळी प्रहार सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष महेश शिंगाडे, माजीत पटेल,मुज्जू हुंडेकरी समर्थ गुंड, सचिन माने, नागेश घाडगे आदीजन उपस्थित होते.

या निवेदनाच्या प्रत केंद्रीय रेल्वे मंत्रालय भारत सरकार,महा प्रबंधक सो मध्य रेल्वे मुंबई,जिल्हाधिकारी सोलापूर, मंडल सुरक्षा आयुक्त सोलापूर, रे. सु.बल. सोलापूर यांना देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!