हरवलेले पाकीट केले पैशासहित परत - Saptahik Sandesh

हरवलेले पाकीट केले पैशासहित परत

केम (प्रतिनिधी-संजय जाधव) :
केम (ता. करमाळा) येथील महादेव पळसकर यांनी रस्त्यात सापडलेले पाकिट प्रामाणिकपणे ज्या व्यक्तीचे पाकीट आहे त्यांना परत दिले.

या बाबतची माहिती अशी कि, केम येथील काका नामदेव जाधव ( मिस्त्री) यांचे शनिवारी (दि.६) मोटारसायकल वरून जाताना खिशातून पाकीट रस्त्यात पडले. त्या पाकिटात सात हजार रुपये,आधार कार्ड, पॅनकार्ड, लायसन्स अशी महत्त्वाची कागदपत्रे होती. हे पाकिट महादा पळसकर यांना सापडले. यानंतर महादा यांनी कागदपत्रे पाहून ते पाकीट जाधव यांच्या घरी
पैशासहित नेऊन दिले. जाधव परिवाराने महादा पळसकर यांचे मनापासून आभार व्यक्त केले. या घटनेनंतर शिवसैनिक असलेले पळसकर यांचा सत्कार केम शिवसेना शाखेच्या वतीने करण्यात आला.
याच बरोबर केम परिसरातून देखील पळसकर यांचे कौतुक केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!