देवळाली येथील सूरज वाघमोडे बेपत्ता - Saptahik Sandesh

देवळाली येथील सूरज वाघमोडे बेपत्ता

करमाळा / संदेश प्रतिनिधी

करमाळा : देवळाली (ता. करमाळा) येथील सूरज तात्या वाघमोडे (वय-२४) हा ११ मे रोजी सकाळी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घरातून निघून गेला आहे. त्याबाबत करमाळा पोलीसात हरवल्याची (मिसींग) नोंद झाली आहे.

यात खबर देणार तात्या मारूती वाघमोडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की सूरज तात्या वाघमोडे हा ११ मे रोजी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास राहत्या घरातून देवळाली येथून भंगार गोळा करण्याकरीता गेला होता. तो परत घरी आला नाही. त्यानुसार पोलीसात हरवल्याची (मिसींग) नोंद झाली आहे.

सदर इसमाची उंची ५ फुट असून सडपातळ शरीरबांधा व रंग काळासावळा आहे. अंगात निळ्या कलरची जीन व पिवळ्या कलरचा शर्ट आहे. सदर वर्णनाची व्यक्ती आढळून आल्यास ०२१८२-२२०३३३ (करमाळा पोलीस) या क्रमांकाशी संपर्क साधावा; असे आवाहन करमाळा पोलीस स्टेशन तर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!