केम येथील दुध उत्पादक शेतकऱ्यांनी दुध डेअरीचे चेअरमनना दुग्धाभिषेक करून केले आंदोलन
केम (संजय जाधव) – केम येथील दुध उत्पादक शेतकऱ्यांनी दुध डेअरीचे चेअरमन यांना दुग्धाभिषेक करून गायीच्या दुधाला ४० रू. दर मिळावा यासाठी अनोखे आंदोलन करण्यात आले.
सुरूवातीला शिवशंभू वेशीवरील राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करून वेशीजवळ हे आंदोलन करण्यात आले. या वेळी ” दुधाला ४०रूपये दर मिळालाच पाहिजे” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.
या आंदोलनाविषयी अधिक माहिती देताना शेतकऱ्यांनी सांगितले की, दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी 3.5/8.5 दुधाला 34 रू दर जाहिर केला होता, तसा शासन निर्णय दि 26 जुन 2023 रोजी काढण्यात आला. परंतु अनेक खाजगी संस्थांनी शेतकऱ्यांकडून 26 रु 27 रुपया ने दुध खरेदी केलं आहे. 3.5/8.5 ला नको सर्व कंपनी वाले snf फॅट डिफरन्स 1 रू ठेवतात त्यामुळें 26 ते 27 रू दर मिळतो 3.2 फॅट व 8.3 snf या दुधाला कोणत्याही अटी शर्ती न लावता अनुदान सहित 40 रू दर मिळावा त्या शेतकर्यांना 1 जुलै 2023 ते 10 जानेवारी 2024 पर्यंत फरक बिले देण्यात यावेत. अनुदान सर्व दुध उत्पादकांना मिळाले पाहिजे, ज्या संस्थांकडून हे अनुदान देण्यात येणार नाही त्यांच्यावरती कारवाई करावी.
दुध उत्पादकांना एक तर कुठल्याही प्रकारच्या अटी शर्ती न घालता 5 रु अनुदान तरी द्यावे अन्यथा शासन निर्णया नुसार दुधाला 40 रु दर देण्यात यावा.कारण पशुखाद्य, औषधे, चारा व पूरक आहाराचे दर सातत्याने वाढत आहेत. दुधाचा उत्पादन खर्च यामुळे मोठ्या प्रमाणात वाढतो आहे. प्रादेशिक दुग्धविकास अधिकारी सतीश देशमुख यांनी माहितीच्या अधिकाराखालील प्रश्नाला उत्तर देताना दुधाचा प्रति लिटर सरासरी उत्पादन खर्च ४२.३३ रुपये येतो असे सांगितले आहे. तरी देखील आम्हाला 34 रुपये दर भेटत नाही आणि आपण मात्र याकडे लक्ष द्यायला तयार नाही. बघ्याची भुमिका घेतली जातेय.
या वेळी प्रहार संघटनेचे सरचिटणीस बापुराव तळेकर, तालुका अध्यक्ष संदिप तळेकर चेअरमन अरूण लोंढे शिवसेना अध्यक्ष सतीश खानट,चेअरमन कालीदास तळेकर, माउली बिचितकर, नागनाथ मंगवडे,सचिन बिचितकर, सोमनाथ तळेकर निलेश गुटाळ, राहुल तळेकर ,दशरथ जाधव या शिवाय मोठ्या प्रमाणावर दुध उत्पादक शेतकरी उपस्थित होते
शेतकऱ्यांच्या दुधाला ४० रू दर मिळावा ही शेतकऱ्यांची मागणी रास्त आहे परंतु शेतकऱ्यांनी आंदोलन करताना दुध खाली न ओतून देता ते गोरं गरिबांना वाटुन शासनाचा निषेध करून आंदोलन करण्यात यावे.
– वर्षाताई चव्हाण, केम (शिवसेना महिला आघाडी उबाठा गट तालुका प्रमुख)