उमरड गावात प्रथमच जीम सुरू – टायगर ग्रूपचे अध्यक्ष तानाजी जाधव यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न

नंदकिशोर वलटे यांजकडून
करमाळा – उमरड (ता.करमाळा) येथे काल (दि.२२) रोजी श्रावी फिटनेस क्लब या गावातील पहिल्या जिमचे उद्घाटन टायगर ग्रूपचे अध्यक्ष तानाजी जाधव व बॉडी बिल्डर विशाल जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी उमरड गावचे नेते वामनराव बदे, श्री.चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यायामाची गरज, फायदे याविषयी तरुणांना मार्गदर्शन केले. करमाळा येथील बाबा पॉवरहाऊस चे मालक आणि बॉडी बिल्डर यांनी विशाल जाधव यांनी फिटनेस संदर्भात मार्गदर्शन करत मशीनवरती वेगवेगळे सेट मारून दाखवले.

उमरड मधील गायकवाड परिवाराने उमरड गाव आणि आसपासच्या गावातील तरुणांची व्यायामाच्या संदर्भात गैरसोय ओळखून गावात सुसज्ज अशी जिम स्थापन केली आहे. याअगोदर या भागातील तरुणांना जिम साठी जेऊर किंवा वीट या ठिकाणी जावे लागत होते परंतु आता जवळ सोय झाल्यामुळे तरुण वर्गात आनंदाचे वातावरण आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!