करमाळा एस.टी.स्टँडसमोर रस्त्यात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी कारवाई -

करमाळा एस.टी.स्टँडसमोर रस्त्यात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी कारवाई

0


करमाळा/संदेश प्रतिनिधी : शहरातील एस.टी. स्टँडसमोर रस्त्यावर हातगाडा लावून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी एका व्यक्तीवर पोलिसांनी कारवाई केली आहे.
12 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी सुमारे 6.10 वाजण्याच्या सुमारास करमाळा पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी शहरात पेट्रोलिंग करत असताना एस.टी. स्टँडसमोर एका हातगाड्यामुळे येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना अडथळा निर्माण होत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी संबंधित व्यक्तीस ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपले नाव रूपलाल नाथुलाल डांगी (वय 29, रा. फंडगल्ली, करमाळा) असे सांगितले. या प्रकरणी रूपलाल डांगी याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम 285 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास करमाळा पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!