केम ग्रा.पं. माजी सदस्या गंगूबाई देवकर यांचे निधन

केम (संजय जाधव). करमाळा तालुक्यातील केम येथील श्रीमती गंगूबाई विठ्ठल देवकर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय वर्षे ८७ होते. त्या केम ग्रामपंचायत च्या दहा वर्षे सदस्या होत्या. त्या सहशिक्षक संतोष देवकर यांच्या मातोश्री होत्या. त्यांच्या पश्चात्त दोन मुले, एक मुलगी,सुना नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या अंत्ययात्रेला सामाजिक, राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते त्यांच्या निधनाने केम परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
