येणाऱ्या खरीप हंगामात खते बियाणे खरेदी करताना दक्षता घ्यावी – गुण नियंत्रण अधिकारी धनंजय पाटील..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : येणाऱ्या 2023 च्या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी खते बियाणे कृषी निविष्ठा खरेदी करताना अधिकृत दुकानातूनच पक्की पावती घेऊन निविष्ठा खरेदी कराव्यात खरेदी केलेल्या निष्ठांची पावत्या जपून ठेवाव्यात, भावी काळात काही तक्रारी निष्पन्न झाल्यास या पावत्याच मोठा आधार ठरतात असे मत सोलापूर जिल्ह्याचे गुण नियंत्रण अधिकारी धनंजय पाटील यांनी व्यक्त केले.

शेतकऱ्यांना बनावट खते बनावट बियाणे बनावट कीटकनाशके विकणाऱ्या कृषी विक्रेत्यांवर कारवाई करून त्यांचे परवाने निलंबित करू असाही इशारा धनंजय पाटील यांनी दिला आहे. खरीप हंगामाच्या 2023 चा आढावा घेण्यासाठी गुण नियंत्रण अधिकारी धनंजय पाटील सोलापूर जिल्ह्याचा दौरा करत आहेत.
करमाळ्यात त्यांनी अनेक दुकानांची तपासणी करून काही महत्त्वपूर्ण सूचना विक्रेतांना दिल्या, यावेळी बोलताना धनंजय पाटील म्हणाले की शेतकऱ्यांनी जागृत राहिली पाहिजे आपण ज्या कृषी निविष्ठा खरेदी करतो त्या खात्रीशीर व परवानाधारक दुकानदाराकडूनच खरेदी कराव्यात या निविष्ठा खरेदी करत असताना त्यावर लिहिलेली अंतिम तारीख निविष्ठा तयार झालेली तारीख पॅकिंग झालेली तारीख या बाबी तपासून घ्याव्यात याशिवाय कृषी निवेष्ठांचे पक्के बिल संबंधित विक्रेत्याकडून घेणे गरजेचे आहे. विशेषतः सोयाबीन उडीद तुर या बियाची पेरणी करत असताना पाकीट मधील किमान 25 ते 50 ग्रॅम बियाणे बाजूला काढून ठेवावे, बियाणांची लागवड करताना बीज प्रक्रिया करणे गरजेचे आहे, रासायनिक खते खरेदी करताना आपले आधार कार्ड लिंक करूनच खरेदी करावे, या रासायनिक खतांना महाराष्ट्रात विक्री करण्यास परवानगी नाही अशा कंपन्यांची खते खरेदी करू नये, काही ठिकाणी बनावट खते विक्री होत असल्यास थेट शेतकऱ्यांनी कृषी खात्याशी संपर्क साधून याची माहिती द्यावी तालुका कृषी कार्यालय तसेच पंचायत समिती मधील कृषी विभागाकडे आपल्या तक्रारी लेखी स्वरूपात किंवा भ्रमणध्वनीवरून द्याव्यात कृषी निविष्ठा विक्री त्यांनी सुद्धा ज्या कंपन्यांना मान्यता आहे अशाच कंपन्यांची खते बियाणे विक्री ठेवावीत कोणत्याही प्रकारच्या बियाण्याची खताची टंचाई करून जास्त दराने खते विकण्याचा प्रयत्न करू नये
जे शेतकरी आधार कार्ड घेऊन खत खरेदी करण्यासाठी त्याच शेतकऱ्यांना रासायनिक खताचा पुरवठा करावा कारण रासायनिक खतावर कोट्यावधी रुपयाची सबसिडी केंद्र सरकार देत असते यामुळे विदाऊट पोस्ट मशीनची खत विक्री करू नये, बनावट खते बियाणे विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कृषी खात्याची करडी नजर असून अशा व्यापाऱ्यांना कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशाराही धनंजय पाटील यांनी यावेळी दिला आहे. 18002334000 हा कृषी विभागाचा फुल टोल फ्री क्रमांक असून यावर आपल्या तक्रारी नोंदवाव्यात, असेही त्यांनी म्हटले आहे.
