काँग्रेस (आय) पक्ष कार्यालयाचा २४ एप्रिलला उद्घाटन समारंभ – आमदार रविंद्र धंगेकर उपस्थित राहणार..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : काँग्रेस आय चे करमाळा तालुका अध्यक्ष प्रतापराव जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त करमाळा शहरात काँग्रेस (आय) पक्ष कार्यालयाचा उद्घाटन समारंभ २४ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला आहे. या कार्यालयाचे उद्घाटन पुणे कसबा मतदार संघातील आमदार रविंद्र (भाऊ) धंगेकर यांचे हस्ते होणार आहे.

यावेळी जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास सोलापूर जिल्ह्यासह तालुक्यातील काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम २४ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता नामरत्न कॉम्प्लेक्स मेनरोड, करमाळा येथे होणार आहे. तरी या कार्यक्रमास काँग्रेस प्रेमींनी उपस्थित रहावे; असे आवाहन आयोजकांनी केले आहे.