वसंतराव नाईक ‘आदर्श कृषी प्रेरणा पुरस्कार’ जेऊर येथील कृषी उद्योजक बाबुराव कळसाईत यांना जाहीर..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : ॲग्रोकेअर कृषी मंच नाशिक यांच्यावतीने देण्यात येणारा वसंतराव नाईक आदर्श कृषी प्रेरणा पुरस्कार जेऊर (ता.करमाळा) येथील कृषी उद्योजक बाबुराव कळसाईत यांना जाहीर कृषी दिनानिमित्त नाशिक येथे आयोजित समारंभात मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.
बाबूराव कळसाईत यांनी शेतीमध्ये उपयोगी अनेक अवजारांचे संशोधन केले असून, जेऊर येथे श्रीनाथ इंजिनियरिंग वर्क्स या नावाचे शेती अवजारे बनवण्याचे वर्कशॉप आहे. स्वतः संशोधन व प्रगत तंत्रज्ञान वापरून कृषी क्षेत्रासाठी आवश्यक ऊस लावणी यंत्र,मल्चिंग पेपर टाकणी यंत्र ,ऊसाची आंतरमशागत व खत पेरणी यंत्र,सर्व प्रकारची पेरणी यंत्र यांची संशोधन करून अवजारांची निर्मिती केली आहे.
त्यांनी तयार केलेल्या अनेक अवजारांची दक्षिण आफ्रिका व फिलिपाइन्स येथे निर्यात केली आहे. याबरोबरच सर्व प्रकारच्या ट्रॅक्टरसाठी लागणारी अवजारे ते तयार करतात.याशिवाय सामाजिक कार्यातही त्यांचा सहभाग असतो. कोरोना काळात अनेक रूग्णांसाठी मोफत ऑक्सीजन सिलेंडर उपलब्ध करून दिले व पोलीस नाकाबंदीसाठी पोलीस विभागाला मोफत बॅरिकेट्सचा पुरवठा केला आहे. यापूर्वी त्यांना सोलापूर सोशल फाउंडेशन च्या वतीने श्रीमंती सोलापूरची या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.
त्यांच्या या कार्याची दखल घेत नाशिक येथील ॲग्रोकेअर यांच्या वतीने त्यांचा वतीने सोळावा राज्यस्तरीय वसंतराव नाईक कृषी प्रेरणा पुरस्कार जाहीर झाला असून दोन जुलै रोजी पंचवटी नाशिक येथे आयोजित कार्यक्रमात नाशिकचे पोलिस आयुक्त अंकूश शिंदे व विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे, या कार्यक्रमाला प्रसिद्ध सिने अभिनेते दिपक शिर्के महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ प्रमोद रसाळ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत अशी माहिती मंचाचे अध्यक्ष विकास भुषण व सचिव रोहीणी पाटील यांनी दिली आहे.