सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना अंतर्गत एकल पालकांच्या मुलांना दरमहा २२५०/- मदत मिळणार - Saptahik Sandesh

सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना अंतर्गत एकल पालकांच्या मुलांना दरमहा २२५०/- मदत मिळणार

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना अंतर्गत अभिनव भारत समाज सेवा मंडळ सालसे यांचेवतीने ज्या मुलांचे आई किंवा वडील मयत आहेत अशा एकल पालकांच्या मुलांना शासनाच्या या योजनेअंतर्गत ० ते १८ वयोगट पर्येंत शासनाकडून मुलांना दरमहा २२५०/- मदत मिळणार आहे. त्यासाठी लवकरात लवकर दिलेल्या पत्त्यावर ५ मे २०२४ पर्यंत आपल्या मुलांचे अर्ज जमा करावेत असे आवाहन अभिनव भारत समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष संतोष राऊत यांनी केले आहे.

यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत..

  • 1 अर्ज
  1. मुलांचे ID size फोटो (२)
  2. मुलांचे व पालकाचे एकत्रित घरासमोरील फोटो
  3. मृत्यू दाखला
  4. बँक पासबुक
  5. मुलांचे जन्म दाखला / बोनाफाईट
  6. मुलांचे आधार कार्ड
  7. सांभाळण्याचा पालकाचे आधार कार्ड
  8. रेशनकार्ड
  9. उत्पन्नाचा दाखला

एकाच कुटुंबातील दोन मुलांचे प्रस्ताव देता येतील. शासकीय योजनेचा लाभ न घेतल्याचे हमीपत्र अर्ज जमा करावयाचा पत्ता – १) सौ. सारिका पवार (८४३२८४३१७६) दत्त मंदिर शेजारी करमाळा २) विनायक सालगुडे (९५२७९५३७०७) ३.तुषार घोलप (८३२९२०००७४) अभिनव भारत समाज सेवा मंडळ, सालसे करमाळा परंडा रोड, सालसे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!