दिग्विजय यांच्या हाती धनुष्यबाण! झोळ बनले जरांगेंचे शिलेदार, आमदार शिंदेसह प्रमुख दावेदार रिंगणात

करमाळा (दि.२९) : यंदाच्या निवडणुकीत अनेक ट्वीस्ट समोर येत आहेत. आमदार शिंदे यांनी महायुतीची उमेदवारी नाकारल्यानंतर महायुती मोठ्या धर्मसंकटात सापडली होती. शिवसेनेकडून महेश चिवटे, भाजपकडून दिग्विजय बागल, गणेश चिवटे, गणेश कराड, सुहास घोलप आदीजण महायुतीकडून उमेदवारी घेण्यासाठी इच्छुक होते. वरीष्ठ पातळीवर अनेक राजकीय खलबत्त झाल्यानंतर अखेर महायुतीने करमाळा माढा मतदारसंघ शिवसेनेसाठी सोडला. शिवसेनेने मुंबईमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत भाजपमधील दिग्विजय बागल यांना शिवसेनेने उमेदवारी देते धनुष्यबाण हाती दिला आहे. यावेळी त्यांच्यासोबत विलासराव घुमरे,मंगेश चिवटे, महेश, दिनेश भांडवलकर,धनंजय डोंगरे, सतीश नीळ, राजेंद्र मोहोळकर, नंदू भोसले आदीजन उपस्थित होते. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांनी बागल यांना पाठिंबा देणार असल्याचे जाहीर केले

आज उमेदवारी भरण्याचा शेवटचा दिवस असून बागल यांना महायुतीची उमेदवारी दिल्यानंतर भाजपकडून निवडणूक लढवू इच्छित कार्यकर्ते गणेश चिवटे व इतर काय भूमिका घेणार ते आज स्पष्ट होईल. दरम्यान करमाळा-माढा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी काल (ता.२८) आमदार संजयमामा शिंदे, मकाई सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन व महायुतीचे नुकतेच जाहीर झालेले उमेदवार दिग्विजय बागल व जरांगे यांचे शिलेदार, दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रामदास झोळ या तिघांनी कोणतेही शक्ती प्रदर्शन न करता साध्या पद्धतीने कार्यकर्त्यांसमवेत तहसील कार्यालयात उमेदवारी अर्ज भरला. निर्णय अधिकारी अंजली मरोड यांनी या सर्वांचे अर्ज स्वीकारले.

या मतदारसंघातील महत्त्वाच्या उमेदवारांपैकी महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार नारायण पाटील यांनी गुरुवारी उमेदवारीचा अर्ज भरला होता महायुतीकडून अजून कोण निवडणूक लढविणार हे जाहीर झाले नव्हते तरी देखील बागल गटाकडून दिग्विजय बागल यांनी अपक्ष उमेदवारी साठी अर्ज दाखल केला होता. आज ते शिवसेने कडून उमेदवारी अर्ज दाखल करतील. काल दिग्विजय बागल यांनी अर्ज भरला त्यावेळी माजी आमदार श्यामल बागल, भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा रश्मी बागल, विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे आदीजण मकाईचे अध्यक्ष दिनेश भांडवलकर, माजी उपसभापती चिंतामणी जगताप, माजी अध्यक्ष धनंजय डोंगरे, पोथरेचे हरिश्चंद्र झिंजाडे, सतीश नीळ, आशिष गायकवाड, गणेश झोळ यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
या मतदारसंघातील पाण्याचा महत्त्वाचा प्रश्न सोडण्यावर माझा भर असणार आहे असे मत दिग्विजय बागल यांनी यावेळी व्यक्त केले. आमदार शिंदे यांनी ३४९० कोटी विकास कामांसाठी निधी खेचून आणल्याचे सांगितली जात असली तरी त्यातील २०४१ कोटी हा फार्स आहे. मिळालेल्या निधीतील बराच निधी हा केंद्र सरकार द्वारा विविध योजनांसाठी दिलेले अनुदान आहे, त्याचे श्रेय आमदार घेत आहेत. माझ्या वडिलांनी वीस वर्षांपूर्वी आमदार असताना ९०० कोटींची कामे केली आणि सध्याचे आमदार आजच्या महागाईच्या काळामध्ये फक्त चौदाशे कोटींची कामे करत आहेत. ही कामे काहीच नाहीत.

आमदार संजय मामा शिंदे यांनीही काल कार्यकर्त्यांसह अपक्ष उमेदवारीचा अर्ज दाखल केला यावेळी त्यांनी कोणतेही शक्ती प्रदर्शन न करता साध्या पद्धतीने अर्ज दाखल केला. माझ्या कार्यकाळात करमाळा तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी भरघोस निधी आणला असुन विकास कामांवर निवडणूक रिंगणात उतरलो आहे असे मत आमदार संजय मामा शिंदे यांनी करमाळा विधानसभा मतदारसंघ उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर बोलताना व्यक्त केले आहे. करमाळयाचा या पुढेही विकास करायचा आहे. मी केलेल्या ३४०० कोटी विकासकामे केल्याच्या वकव्याला विरोधक टीका करत असले तरी मी कधीही खोटी आश्वासने देत नाही आणि पुराव्याशिवाय बोलत नाही. त्यामुळे केलेल्या विकास कामाबाबत माझी कुणाशीही बोलण्याची तयारी आहे’, असे म्हणत त्यांनी माजी आमदार नारायण पाटील यांनी दिलेले चॅलेंज स्वीकारले.
आमदार शिंदे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला त्यावेळी त्यांच्या बरोबर बाजार समितीचे माजी संचालक चंद्रकांत सरडे, विलास पाटील, बाजार समितीचे माजी उपसभापती दत्तात्रय अडसूळ, विटचे उदय ढेरे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य उद्धव माळी, सामाजिक कार्यकर्ते विवेक येवले, मानसिंग खंडागळे, युवराज गपाट, चंद्रहस निमगिरे, सरपंच रवींद्र वळेकर, अशपाक जमादार, कन्हैयालाल देवी,माजी नगरसेवक प्रवीण जाधव, सावडीचे श्री. शेळके, केशव दास आदी उपस्थित होते.

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचे शिलेदार म्हणून करमाळा-माढा विधानसभा निवडणुकीसाठी दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रामदास झोळ यांनी कार्यकर्त्यांसह काल अर्ज दाखल केला आहे. मराठा आरक्षणाच्या विविध ठिकाणच्या आंदोलनात प्रत्यक्ष सहभाग घेत आंदोलनाला जाणाऱ्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करत त्यांना पेट्रोल, डिझेलची, जेवणाची सोय त्यांनी केली होती. त्याचप्रमाणे मराठा समाजाला इतर समाजाप्रमाणे शैक्षणिक सवलती मिळाव्यात म्हणून प्रयत्न केल्याने त्यांना जरांगे पाटील यांचे शिलेदार म्हणून उमेदवारी देण्यात आली आहे.
यावेळी दत्तकला शिक्षण संस्थेच्या सचिव सौ. मायाताई झोळ, शेतकरी कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष दशरथ कांबळे, काँग्रेसचे आयचे जेष्ठ नेते जिल्हा संघटक हरीभाऊ मंगवडे, लालासाहेब जगताप, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र गोडगे, चंद्रशेखर जगताप, तालुका अध्यक्ष सुदर्शन शेळके, सुनील भांगे, सत्यवान गायकवाड, अमोल घुमरे, संतोष बागल, भानुदास साखरे, शालन खाटमोडे, गोपीनाथ पाटील, अण्णासाहेब पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते होते. करमाळा तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाबरोबरच शिक्षण,आरोग्य, उद्योग तसेच रोजगार निर्मितीसाठी विकासाच्या मुद्द्यावर विधानसभेची निवडणूक लढवणार असल्याचे प्रा. रामदास झोळ यांनी सांगितले आहे.




