यशकल्याणी तर्फे जीवनगौरव पुरस्कार व इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांना सन्मान – करमाळा येथे भव्य समारंभ संपन्न

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
यशकल्याणी सेवाभावी संस्था, करमाळा, शिक्षण विभाग जिल्हा परिषद सोलापूर आणि सोलापूर जिल्हा इंग्रजी शिक्षक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘जिल्हास्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धा’ व ‘जीवनगौरव पुरस्कार वितरण समारंभ’ ‘यशकल्याणी’ सभागृह करमाळा येथे यशस्वीरित्या पार पडला.

या भव्य सोहळ्यात विविध सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. यामध्ये करमाळ्याचे ख्यातनाम स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. वसंतराव पुंडे, कर्नाटकातील पक्षी व पर्यावरण अभ्यासक प्रा. डॉ. अरविंद कुंभार, पिंपरी-चिंचवड येथील निवृत्त प्रशासकीय अधिकारी श्रीमती शारदाताई लोंढे, तसेच मोहोळ येथील निवृत्त प्राध्यापक व शिक्षणतज्ज्ञ प्रा. गुरुनाथ मुचंडे यांचा समावेश होता. स्मृतिचिन्ह, शाल व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते.

या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून पुण्यातील ख्यातनाम भूलतज्ज्ञ व मिसेस युनिव्हर्स प्रचिती पुंडे यांनी उपस्थित राहून उपस्थितांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष गणेशभाऊ करे-पाटील, मातोश्री मालतीताई करे-पाटील, डॉ. अक्षय पुंडे, डॉ. कविता कांबळे, गटशिक्षणाधिकारी जयवंत नलवडे, जिल्हाध्यक्ष प्रा. बाळकृष्ण लावंड, जिल्हा सचिव प्रा. धनाजी राऊत, प्रा. जयेश पवार, अतुल दाभाडे, उपाध्यक्ष अगतराव भोसले, आबासाहेब दाढे, शशिकांत चंदनशिवे, सुखदेव गिलबिले, किशोर शिंदे, श्रीमंतराजे भोसले, आसिफ तांबोळी, संजय कुचेकर व इतर मान्यवर उपस्थित होते.

या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी भाषेतील आत्मविश्वास, वक्तृत्व कौशल्य व सार्वजनिक संवादाची क्षमता वाढवण्यास मोठी मदत झाली असल्याचे मत अनेक मान्यवरांनी व्यक्त केले. हा कार्यक्रम शैक्षणिक व सामाजिक दृष्टिकोनातून अत्यंत प्रेरणादायी ठरला.
—
जिल्हास्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेतील विजेते
या स्पर्धेत जिल्ह्यातील ११ तालुके आणि सोलापूर महापालिका क्षेत्रातून २००० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून विक्रमी प्रतिसाद दिला. स्पर्धेचे परीक्षण प्रा. चंद्रकांत साळुंके, प्रा. संजय पवार, प्रा. तुषार सूत्रावे व दिपक सोनवणे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. विष्णू शिंदे यांनी केले, तर आभार प्रदर्शन तालुका अध्यक्ष कल्याणराव साळुंके यांनी केले.
गट 1 – इयत्ता ५ वी व ६ वी
क्रमांक नाव शाळा
1️⃣ प्रथम कु. अन्वी संजय गर्जे जि. प. प्रा. केंद्र शाळा करंजे, करमाळा
2️⃣ द्वितीय चि. मुजमील मुस्ताक शेख सुरवसे हायस्कूल, सोलापूर
3️⃣ तृतीय चि. इरेश प्रशांत प्रचंडे एच. जी. प्रचंडे हायस्कूल, नागणसूर, अक्कलकोट
उत्तेजनार्थ कु. स्वराली व्यवहारे नूतन विद्यालय, आष्टी, मोहोळ
उत्तेजनार्थ चि. श्रेयश नष्टे महात्मा फुले विद्यालय, बार्शी
—
गट 2 – इयत्ता ७ वी व ८ वी
क्रमांक नाव शाळा
1️⃣ प्रथम कु. श्लोका दत्ता ढोणे संत सावता माळी विद्यालय, अरण, माढा
2️⃣ द्वितीय कु. मिताली गुडे सुयश विद्यालय, बार्शी
3️⃣ तृतीय कु. अलिशा दाफेदार नूतन विद्यालय, मंगळूर, अक्कलकोट
उत्तेजनार्थ कु. अनघा सावंत डॉ. बी. जे. दाते प्रशाला, नातेपुते, माळशिरस
उत्तेजनार्थ कु. मृण्मयी वहील डी एच के प्रशाला, पंढरपूर
—
गट 3 – इयत्ता ९ वी व १० वी
क्रमांक नाव शाळा
1️⃣ प्रथम चि. शुभम व्यवहारे नूतन विद्यालय, कुर्डूवाडी, माढा
2️⃣ द्वितीय कु. श्रावणी हवीनाळे यशवंत विद्यालय, औराद, दक्षिण सोलापूर
3️⃣ तृतीय कु. समृद्धी माळी न्यू इंग्लिश स्कूल, सांगोला
उत्तेजनार्थ कु. वैष्णवी गावकरे नूतन हायस्कूल, बोराळे, मंगळवेढा
उत्तेजनार्थ कु. यशश्री मेटकरी यशवंतराव चव्हाण विद्यालय, फळवणी, माळशिरस
—



