म्हसेवाडीत तरुणाला दगड व लाकडी काठीने मारहाण

करमाळा/संदेश प्रतिनिधी
करमाळा,ता.२१: म्हसेवाडी (ता. करमाळा) येथे जुन्या कारणावरून झालेल्या वादातून एका तरुणाला दगड व लाकडी काठीने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा करमाळा पोलिसांत दाखल झाला आहे.
याबाबत राजेंद्र रामदास आडसुळ (वय ३६, रा. म्हसेवाडी, ता. करमाळा) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.
त्यात त्यांनी म्हटले,की , दि. १७ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी सुमारे ८.३० वाजण्याच्या सुमारास ते घरी असताना गावातील प्रदीप शेषाआप्पा ननवरे यांनी फोन करून त्यांना घराबाहेर बोलावले. घराबाहेर आल्यानंतर ‘तुझे वडील मला न सांगता मुंबईला का गेले?’ असे म्हणत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
यावेळी फिर्यादी यांनी शिवीगाळ करू नका, असे सांगितले असता आरोपीने जवळ पडलेला दगड उचलून त्यांच्या उजव्या हाताच्या बोटावर मारला. तसेच लाकडी काठीने पाठीवर मारहाण केली. उजव्या खांद्याला चावा घेऊन हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच जीवे मारण्याची धमकी दिली.
या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

error: Content is protected !!