महात्मा गांधी विद्यालयाचे सेवानिवृत्त शिक्षक एल.यू. कांबळे  यांचे निधन - Saptahik Sandesh

महात्मा गांधी विद्यालयाचे सेवानिवृत्त शिक्षक एल.यू. कांबळे  यांचे निधन

करमाळा /संदेश प्रतिनिधी : येथील महात्मा गांधी विद्यालयाचे सेवानिवृत्त संगित शिक्षक तथा क्रीडा शिक्षक लक्ष्मण उत्तम कांबळे (एल. यू. कांबळे सर) यांचे मंगळवारी (ता. २२) रात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, जावई व नातवंडे असा परिवार आहे.

कांबळे सर हे करमाळा येथील भीमनगर परिसरात वास्तव्यास होते. महात्मा गांधी विद्यालयात त्यांनी अनेक वर्षे संगीत शिक्षक व क्रीडा शिक्षक म्हणून उल्लेखनीय सेवा बजावली. विद्यार्थ्यांमध्ये संगीत आणि क्रीडाविषयक आवड निर्माण करण्याबरोबरच त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी आपली कारकीर्द घडवली. त्यांच्या कार्यातून अनेक विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली.

त्यांच्या निधनाची वार्ता समजताच कुटुंबीय, मित्रपरिवार, सहकारी शिक्षक, माजी विद्यार्थी तसेच शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील व्यक्तींनी दुःख व्यक्त केले. त्यांच्या निधनाने विद्यालयाच्या शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. बुधवारी (ता. २३) सकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवर, नातेवाईक, मित्रपरिवार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!