रस्त्याच्या कडेला भंगाराचे साहित्य टाकून वाहतुकीस अडथळा-स्क्रॅप सेंटरच्या मालकाविरुद्ध गुन्हा दाखल

करमाळा / संदेश प्रतिनिधी

करमाळा, ता:7 जातेगाव रस्त्याच्या दोन्ही बाजूंना भंगाराचे साहित्य लावून सार्वजनिक वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी दत्तकृपा स्क्रॅप सेंटरच्या मालकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार १ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडला.

याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण कैलास चव्हाण यांनी फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, जातेगाव येथील दत्तकृपा स्क्रॅप सेंटरच्या मालकाने सेंटरमधील भंगाराचे साहित्य (स्क्रॅप मटेरियल) रस्त्याच्या दोन्ही बाजूंना लावून ठेवले होते. त्यामुळे सार्वजनिक रस्त्यावरून होणाऱ्या वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. नागरिकांच्या रहदारीला अडचण होईल अशा पद्धतीने साहित्य ठेवण्यात आल्याने पोलिसांनी याची दखल घेतली.
या प्रकरणी दत्तकृपा स्क्रॅप सेंटरच्या मालकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

error: Content is protected !!