1989 च्या दहावीच्या विद्यार्थ्यांची 35 वर्षांनी भेट – स्नेहमेळावा संपन्न..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : कर्मवीर अण्णासाहेब जगताप विद्यालयत 1989 च्या वर्षी दहावीत असलेल्या विद्यार्थ्यांचा 35 वर्षानंतर एकत्र येत स्नेह मेळावा करमाळा येथे साजरा करण्यात आला.
शालेय मित्र मैत्रीणी एकत्र यावे यासाठी 1989 च्या दहावी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा आयोजित करून कर्मवीर अण्णासाहेब विद्यालयाचे माजी विद्यार्थी सुनील देशमाने, बापू माळी, सदाशिव हेगडे, युवराज चंदनशिवे, हरिदास काळे सर आणि आशालता गायकवाड या सर्वांनी दोन महिन्यापासून सर्वमित्र-मैत्रिणींचे संपर्क साधुन ग्रुप तयार केला.
या स्नेहमेळाव्यात आशालता यांनी प्रास्ताविक केले, यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मुख्याध्यापक गुलाबराव बागल होते, याप्रसंगी सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी स्वतःचा परिचय करून दिला, प्रशांत कांबळे, हारीदास काळेजय हारी , संभाजी जगताप,सुनील देशमाने अगदी मनमोकळे पणाने विद्यार्थ्यांनी आपापले मनोगत व्यक्त केले.
यावेळी सर्व शिक्षकांना सर्व विद्यार्थ्यामार्फत काॅपर बाॅटल सेट गिफ्ट देवुन व जरीचे फेटे बांधून आदर करण्यात आला. माजी मुख्याध्यापक गुलाबराव बागल आशोक काटुळे, रमेश कवडे,आर्जुन फंड, कला शिक्षक घोडके , खोसे मॅडम, शहाने मॅडम, निफाडकर मॅडम आदी जणांनी मनोगत व्यक्त केले. सर्व विद्यार्थिनींना माहेरची साडी म्हणून गिप्ट शिक्षकांच्या हस्ते देण्यात आली. यावेळी सिताराम हेगडे , प्रमोद असादे , वैशाली दोशी संभाजी जगताप , दत्ता बडेकर , अनूप खोसे , रेखा कटारिया, समद शेख , योगेश राठोड, सिकंदर जाधव , धनंजय काटूळे , तुकाराम शिरसागर, आत्माराम रासकर, दस्तगीर मुजावर आदी माजी विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन चोपडे यांनी केले.