फेक न्यूज, एडिटेड फोटो,व्हिडीओची सत्यता तपासणे गरजेचे – यासाठी विविध टूल्स व चॅनेल्स आहेत उपलब्ध
नुकतंच एका व्हाट्सअप ग्रुप वर मला खालील प्रकारचा मेसेज पाहायला मिळाला.
हा मेसेज forwarded Many times अशा टॅग सहित दिसत होता. (म्हणजेच हा खूप लोकांकडून प्रसारित केला जात आहे.). या मेसेजची सत्यता तपासण्याची हेतून गुगल वर जाऊन मी चेक केले तेव्हा समजले की त्या मस्जिदवर पाकिस्तानचा झेंडा फडकवला म्हणून ती पाडली नाही तर रस्ता रुंद करण्यासाठी पाडण्यात आलेली आहे, जी की अनधिकृत जागेवर बांधण्यात आली होती. संबंधित न्यूज लिंक –
अशा प्रकारच्या अनेक फेक न्यूज, फोटोज लोक फॉरवर्ड करत असतात व वाचणारे वाचून तेच खरं मानत असतात.
समाजात असे अनेक विचित्र प्रकारचे लोक, संघटना, राजकिय पक्षाचे IT Cell आपल्या विरोधातील लोकांच्या, संघटनांच्या अथवा पक्षाच्या विरोधात चुकीची माहिती पसरविण्यासाठी, बदनामी करण्यासाठी किंवा आपल्या व्यक्तीची समाजात प्रतिष्ठा वाढविण्यासाठी, मते मिळविण्यासाठी अनेक एडीट केलेले फोटोज, व्हिडिओ
व्हाट्स अॅप, इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटर या सारख्या विविध सोशल मिडिया वरून व्हायरल केले जातात.
सर्वसामान्यपणे लोक अशा फोटो, व्हिडिओची कोणतीही शहानिशा न करता जे आहे ते खरे मानून पुढे जातात काही जण विविध ग्रुप्सला फॉरवर्ड करतात अथवा आपल्या पेज ला शेअर करतात.अशा गोष्टींमुळे धर्माधर्मामध्ये जातीजातीमध्ये वाद निर्माण होऊ शकतात.सामाजिक तेढ निर्माण होऊ शकते. एखाद्या व्यक्ती, संस्था, संघटनेची समाजात अनेक वर्षांपासून केलेल्या कामातून मिळविलेली प्रतिष्ठा धुळीस मिळू शकते.
अशा गोष्टींमधून सोशल मीडियाची काळी बाजू समोर येते. या अशा फेक न्यूज वर कंट्रोल करणे गरजेचे आहे. अशा फेक न्यूजवर कंट्रोल करण्यासाठी
अनेक चॅनल्स, वेबसाईट समोर आलेले आहेत. याचबरोबर गुगलने देखील इंटरनेटवर एक टूल आणलेले आहे.
गुगल सर्चमध्ये तुम्ही Google Fact Check Tool असे टाकले की तुम्हाला हे टूल्स मिळेल
याबरोबरच तुमच्याकडे एखादी एडिटेड इमेज (फोटो) असेल आणि त्याच सारखी दुसरी इमेज आपल्याला गुगलमध्ये पहायची असेल तर गुगल सर्च मध्ये रिव्हर्स इमेज सर्च (Reverse Image Search) असे टाईप केले की तुम्हाला अनेक वेबसाइट्स पाहायला मिळतील या वेबसाईटवर तुम्ही संबंधित फोटो अपलोड करून त्याविषयी बातमी किंवा संबंधित फोटो पाहून सत्यता तपासू शकता.
याचबरोबर खालील वेबसाईटस सुद्धा फोटो व्हेरिफिकेशन (पडताळणी) साठी वापरू शकतो.
- tineye
- Small seo tools
- Duplichecker
याबरोबरच अनेक युट्यूब चैनल, वेबसाईटस देखील उपलब्ध आहेत ज्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटो किंवा व्हिडिओ वर सत्यता तपासून त्याविषयी आर्टिकल अथवा व्हिडिओ बनवतात.
- Factly
- Alt News
- Quint
- Social Media Hoax Layer
- BoomLive
- Newschecker
- Logical Indian
याशिवाय अनेक मोठ्या न्यूज चॅनेल्सकडे देखील फॅक्ट चेक करणारी टीम कार्यरत असते. उदा. इंडिया टुडे (India Today ) ची फॅक्ट चेक न्यूज- https://www.indiatoday.in/fact-check
अशा सर्व गोष्टींचा वापर करून आपण अफवा, चुकीची, खोटी माहिती पसरविण्यापासून लोकांना रोखू शकतो. खाली ३ उदाहरणे दिली आहेत. ज्यात राहुल गांधी ना , नरेंद्र मोदींना टार्गेट केले आहे तसेच हिंदू , मुस्लिम लोकांना बदनाम करण्यासाठी टार्गेट केले आहे.
✍️ इंजि. सुरज हिरडे, मो. 8805238464