करमाळा शहरातील गटारी, नाले साफसफाई कामांना सुरुवात

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : करमाळा शहरातील पावसाळ्यापूर्वी नाले , गटारी आणि रस्त्यांची साफसफाई जलदगतीने करावी अशी मागणी भाजपा व्यापार आघाडीचे शहराध्यक्ष जितेश कटारिया यांनी काही दिवसांपूर्वी प्रसिध्दी पत्रकाद्वारे करमाळा नगरपालिका प्रशासनाकडे केली होती, त्यानुसार
त्यांच्या मागणीला नगरपालिका प्रशासनाने सकारात्मकता दाखवत शहरातील सर्व नाल्यांची साफ सफाई ला सुरुवात झाली आहे. त्यामुळे श्री.कटारिया यांनी प्रशासनाचे आभार व्यक्त केले.


याचबरोबरीने करमाळा शहरातील श्रीदेवीचामाळरोडवरील आयडिबीआय बँक जवळील पुलावर संरक्षक कठडे नसल्यामुळे तो भाग धोकादायक बनला होता, गेल्या वर्षी नवरात्रीवेळी ही बाब नगरपालिका प्रशासनास लक्षात आणून दिली होती, त्याला अखेर मुहूर्त लागून तेथील संरक्षक कठडे बांधण्याचे काम सुरू केले असून त्याबद्दल जितेश कटारिया यांनी प्रशासनाचे आभार मानले आहेत.

