उत्तरेश्वर विद्यालयाच्यावतीने केम येथे दिंडी सोहळा उत्साहात संपन्न
केम(संजय जाधव) – आषाढीवारी निमित्त श्री उत्तरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय केम यांच्य वतीने दिंडी सोहळा चे आयोजन करण्यात आले होते.
प्रथम माऊलीच्या पालखीचे पूजन प्रशालेचे मुख्याध्यापक श्री कदम एस.बी सर, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री वसंत तळेकर, उपाध्यक्ष वस्ताद गणेश तळेकर , श्री सचिन रणशृंगारे यांच्या हस्ते करण्यात आले त्यांनर दिंडी काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी पारंपारिक पोशाखात विठू नामाचा गजर करून वातावरणात चैतन्य निर्माण केले. विठ्ठल आणि रुक्माई, डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन विद्यार्थिनी, वारकरी झालेले विद्यार्थी टाळ मृदंगाच्या साह्याने अभंग म्हणत केम परिसरातील नागरिकांची मने जिंकली. , विद्यार्थ्यांनी रामकृष्ण हरी असा जयघोष करून भक्तिमय वातावरण निर्माण केले. या दिंडी मध्ये सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांची उपस्थिती होते हा दिंडी सोहळा पाहण्यासाठी नागरिकांनी चौकात गर्दी केली होती
आ.संजयमामा शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळामध्येच कुकडी उजनी उपसा सिंचन योजनेच्या सर्वेक्षणासाठी तत्कालीन जलसंपदा मंत्री ना.जयंत पाटील यांच्याकडे निधीची मागणी केलेली होती, परंतु त्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळल्यामुळे तो विषय प्रलंबित होता. विद्यमान महायुती सरकारच्या कार्यकाळामध्ये आ.शिंदे यांनी 1 जुलै 2024 रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या योजनेच्या सर्वेक्षणासाठी निधीची मागणी केली.
त्यानुसार सदर प्रस्ताव कृष्णा खोरे विकास महामंडळाकडून जलसंपदा विभागाला सादर झालेला असून त्यामध्ये कुकडी उजनी उपसा सिंचन योजनेच्या सर्वेक्षणासाठी 47 लक्ष निधीची मागणी केली आहे.
अशी असेल कुकडी उजनी उपसा सिंचन योजना…
आमदार संजयमामा शिंदे यांची संकल्पनेनुसार प्रस्तावित केलेली कुकडी उजनी उपसा सिंचन योजना महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाकडून दोन टप्प्यांमध्ये प्रस्तावित केलेली आहे.
टप्पा 1 –
रिटेवाडी येथून पाणी उचलून ते मोरवड येथील कुकडीच्या अस्तित्वातील कॅनॉल मध्ये टाकले जाईल. हे अंतर 20.13 किमी आहे त्यासाठी 18 00 मी मी व्यासाच्या 2 समांतर पाईपलाईन व 32 34 अश्वशक्ती क्षमतेचे 8 विद्युत पंप सुचविलेले आहेत. या पहिल्या टप्प्यातील योजनेमधून 18472 हेक्टर क्षेत्र ओलीताखाली येणार आहे.
टप्पा 2 –
या टप्प्यात केतुर येथून पाणी उचलून ते सावडी येथील कुकडीच्या अस्तित्वातील कॅनॉलमध्ये टाकले जाईल. हे अंतर 17.60 किलोमीटर असून त्यासाठी 800 मी मी व्यासाची 1 पाईपलाईन सुचविलेली आहे. सदर पाणी उचलण्यासाठी 3100 अश्वशक्तीचे 4 विद्युत पंप सुचविलेले आहेत. सदर टप्प्यावरून 5790 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणे अपेक्षित आहे.