सुराणा विद्यालयातील कार्तिकी गुटाळची जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

करमाळा (संदेश प्रतिनिधी) – जेऊर येथील भारत महाविद्यालयात येथे दि.१८ रोजी झालेल्या तालुकास्तरीय फ्री स्टाईल कुस्ती प्रकारात श्रीमती रामबाई बाबुलाल सुराणा विद्यालयाची विद्यार्थिनी कु.कार्तिकी मारुती गुटाळ हिने तालुकास्तरीय कुस्ती प्रकारात प्रथम क्रमांक मिळवला आहे. तिची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

या कुस्ती प्रकारासाठी तिला क्रीडा शिक्षक श्री.धस. वाय.एम यांचे मार्गदर्शन लाभले.तिच्या या यशाबद्दल मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी,स्थानिक स्कूल कमिटी,शाळा व्यवस्थापन समिती समस्थ ग्रामस्थ चिखलठाण पंचक्रोशीतून तिचे अभिनंदन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!