अल्पवयीन 15 वर्षाच्या मुलीस फुस लावून पळविले - अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल.. -

अल्पवयीन 15 वर्षाच्या मुलीस फुस लावून पळविले – अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल..

0

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : कंदर तालुका करमाळा येथे एका पंधरा वर्षाच्या मुलीला फूस लावून पळून नेल्याची घटना 11 मे रोजी घडली आहे, याप्रकरणी एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी या पंधरा वर्षाच्या मुलीच्या वडिलांनी करमाळा पोलिसात फिर्याद दिली असून, त्यात त्यांनी म्हटले आहे की, मी पिंपळखुटे ता.माढा जि.सोलापूर येथे राहत असून, माझी आई, पत्नी तीन मुली असे एकत्रात राहणेस असून मी मोलमजुरी करून आमचे कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. 11 मे रोजी सकाळी 10 चे सुमारास मी माझी मुलगी (वय 15 वर्षे) हिस कंदर ता.करमाळा येथील नातेवाईक येथे मुलीला उन्हाळयाची सुटी असल्याने सोडले होते.

त्यानंतर 13 मे रोजी सकाळी 6 वा च्या सुमारास नातेवाईक यांचा फोन आला व त्यांनी मला सांगितले की, माझी पत्नी व घरातील सर्वजण तसेच तुमची मुलगी असे सर्वजण जेवणखाण करून 12 मे रोजी रात्री 10:00 वा. चे सुमारास घराबाहेर झोपलो होते. दिनांक 13 मे रोजी पहाटे 05/30 वाचे सुमारास माझी पत्नी हि झोपेतून उठून पाहिले असता तुमची मुलगी हि झोपले ठिकाणी दिसून आली नाही, आम्ही तिचा आजूबाजस शोध घेतला असता, ती सापडली नाही, असे नातेवाईकांनी सांगितले. मी सदर माहिती घरातील सर्वांना सांगितली त्यानंतर मी व सोबत नातेवाईक, माझे सासरे तसेच पत्नी असे सर्वांनी मिळून कंदर ता.करमाळा पाहिले असता मुलगी दिसली नाही, त्यानंतर खात्री झाली कि, कोणीतरी अज्ञात व्यक्तीने कोणत्यातरी फुस लावुन पळवून नेले आहे. याप्रकरणी करमाळा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!