कमलाभवानी देवीच्या दर्शनाने स्वाभिमानी शेतकरी सहकार पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ

करमाळा (प्रतिनिधी) : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी सहकार पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ करमाळा येथील श्री कमलाभवानी देवीच्या दर्शनाने करण्यात आला. आमदार रणजितसिंह मोहिते पाटील आणि खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
यावेळी माजी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासह पॅनलचे उमेदवार डॉ. अनिकेत देशमुख, संग्रामसिंह जहागीरदार, शिवाजी पाटील, सिंधू सुरेश पाटील, अस्मिता गायकवाड आणि ॲड. दत्तात्रय खडतरे यांनी कमलाभवानी मातेच्या चरणी नतमस्तक होत सहकार क्षेत्राच्या माध्यमातून शेतकरी, सभासद आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला.

या निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी सहकार पॅनलच्या सर्व उमेदवारांना ‘शिट्टी’ या चिन्हावर मतदान करून विजयी करावे, असे आवाहन माजी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील आणि खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष वसंतराव देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य सवितादेवी राजेभोसले, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, शहाजीराव देशमुख, डॉ. वसंतराव पुंडे, उदयसिंह मोरे पाटील, महेंद्र पाटील, देवानंद बागल, ॲड. बाळासाहेब पाटील, ॲड. लुणावत, ॲड. सविता शिंदे, प्रवीण कटारिया, दशरथ कांबळे, संतोष खाटमोडे पाटील, अमरजित साळुंके, डॉ. अमोल घाडगे, संतोष वारे, दत्तात्रय देशमुख, अभयसिंह राजेभोसले, आबासाहेब टापरे, डॉ. अमोल दुरुंदे, निलेश झोळ, ॲड. प्रशांत बागल, ज्ञानेश्वर लोकरे, महेश पाटील, ज्ञानेश्वर पवार, गणेश कांबळे, शिवाजी जाधव, मुस्तकीम पठाण आणि ऋषिकेश सिकची यांच्यासह करमाळा तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

