जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी दोघाविरूध्द गुन्हा दाखल.. - Saptahik Sandesh

जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी दोघाविरूध्द गुन्हा दाखल..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : जातीवाचक शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी दोघांविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार १४ जुलैला सकाळी नऊच्या सुमारास केडगाव (ता. करमाळा) येथे घडला आहे.

यात बिंटी राजा काळे (रा. केडगाव) या महिलेने फिर्याद दिली आहे. त्यात तिने म्हटले आहे, की गावातील एका कट्ट्यावर बसलो असता गावातील आनंद ऊर्फ तात्या बोराडे व विवेक बोराडे या दोघांनी मला तसेच माझा मुलगा बापू, सुन गीता व जाऊ स्वाती असे आम्हा चौघांना जातीवाचक शिवीगाळ करून दगडाने, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे.

या प्रकरणी पोलीसांनी अनुसूचित जाती जमाती कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील हे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!