जेऊर ग्रामपंचायतीची ४० हजाराची चोरी..
करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा : जेऊर (ता.करमाळा) येथील ग्रामपंचायतीच्या मालकीच्या पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीतील मोटार पॅनल बोर्ड आदी ४० हजार रूपये किंमतीच्या सामानाची चोरी झाली आहे.
या प्रकरणी जेऊर ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी सलीमसाब फकीरसाब शेख यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, की १९ जुलै पूर्वी जेऊर ग्रामपंचायतीची दहिगाव येथील पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीतील पाईप, केबल, रस्सी व २० एचपीची पाणबुडी मोटार, पॅनल बोर्ड, लोखंडी पेटी असा ४० हजार रूपयाचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रविण साने हे करत आहेत.