कवी दादासाहेब पिसे यांच्या “प्रवासात” या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा

प्रमिला जाधव यांजकडून

करमाळा (दि.१४) – करमाळा येथील कवी दादासाहेब सुभाष पिसे यांच्या “प्रवासात” या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा रविवार दिनांक १७ सप्टेंबर रोजी करमाळा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात होणार आहे.

या कार्यक्रमाला प्रसिद्ध कवी प्रा.डॉ. सुरेश शिंदे व “प्रेमाचा जांगडगुत्ता” फेम प्रसिद्ध कवी नारायण पुरी हे कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण आहेत. या कार्यक्रमासाठी “काडवान” या काव्य संग्रहाचे कवी प्रकाश लावंड हे अध्यक्ष म्हणून उपस्थित असणार आहेत. या सोहळ्यास प्रमुख उपस्थिती म्हणून विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे तसेच विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष मिलिंद फंड त्याचप्रमाणे यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गणेश करे-पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.

हा कार्यक्रम १७ सप्टेंबर रोजी ४ वाजता चव्हाण महाविद्यालयातील विजयश्री सभागृहात होणार आहे. तालुक्यातील व परिसरातील काव्यरसिकांनी या प्रकाशन सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक करमाळा तालुका साहित्य मंडळ व यशवंतराव चव्हाण महाविद्यालय करमाळा यांच्या वतीने करण्यात आले आहे.

कवी दादासाहेब पिसे यांनी वयाच्या 42 व्या वर्षी काव्य लेखनास प्रारंभ केला. जून 2019 पासून आत्ता पर्यंत त्यांनी साडेतीन हजार पेक्षा जास्त कवितांचा टप्पा पूर्ण केला आहे. यात देशभक्तीपर गीते, भावगीते, गौरव गीते यांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!