घोटी येथील १७ वर्षाची मुलगी बेपत्ता
करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा, ता. २२ : घोटी (ता.करमाळा) येथील १७ वर्षे ३ महिने वयाची मुलगी बेपत्ता झाली आहे. हा प्रकार १८ सप्टेंबर ला दुपारी ११ ते २ या वेळेत घडला आहे.
या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी पोलीसात फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले, की १८ सप्टेंबरला सकाळी ११ वाजता मी शेतात गेलो, त्यावेळी माझी १७ वर्षे ३ महिने वयाची मुलगी घरी होती. मी २ वाजता परत आलो तर सदरची मुलगी बेपत्ता असल्याचे दिसले. सर्वत्र चौकशी केली पण तीचा शोध लागला नाही. त्यामुळे तीला कोणीतरीअज्ञान व्यक्तीने अज्ञात कारणासाठी पळवून नेले आहे. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रविण साने हे करत आहेत.