केम येथील कालिदास कुंभार जिल्हास्तरीय लांबउडीत प्रथम

केम (प्रतिनिधी/संजय जाधव) – जिल्हा स्तरीय क्रिडा स्पर्धेत १४वर्ष वयोगटात केम येथील आश्रम शाळेतील विद्यार्थी कुमार कालिदास कुंभार याने जिल्हा स्तरीय लांब उडी स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला आहे जिल्हा स्तरीय लांब उडी स्पर्धा अक्कलकोट क्रिडा संकुल सोलापूर येथे झाली होती त्याची विभागीय स्तरावर लांब उडी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

या कालिदासला क्रिडा शिक्षक किरण परदेशी यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष सुदर्शन तळेकर सचिव भाऊसाहेब बिचितकर मुख्याध्यापक विजय बिचितकर व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यानी अभिनंदन केले आहे त्याचे केम व परिसरातून कौतुक केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!