प्रधानमंत्री सुरक्षा विम्यामुळे जाधव कुटुंबाला दोन लाखांचा आधार

केम, संजय जाधव: अपघाती निधनानंतर कुटुंबाला आर्थिक आधार मिळावा, या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा लाभ केम येथील जाधव कुटुंबाला मिळाला आहे. दिवंगत सरस्वती मच्छिंद्र जाधव यांचे पती मच्छिंद्र कोंडीबा जाधव यांना बँक ऑफ महाराष्ट्राच्या केम शाखेतर्फे दोन लाख रुपयांचा विमा धनादेश सुपूर्द करण्यात आला.

सरस्वती जाधव यांचे १७ जुलै रोजी अपघाती निधन झाले होते. त्यांचे बँक ऑफ महाराष्ट्राच्या केम शाखेत बचत गटाचे खाते होते. उमेद अभियानांतर्गत त्यांचा प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेत विमा उतरविण्यात आला होता. त्यांच्या निधनानंतर कुटुंबीयांना या विम्याचा लाभ मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करण्यात आला. त्यानंतर दोन लाख रुपयांचा विमा मंजूर करण्यात आला.

उमेद अभियानांतर्गत कृषी सखी प्रियांका निलेश ओहोळ यांच्या माध्यमातून केम परिसरातील अनेक महिलांचे प्रधानमंत्री सुरक्षा विमा व प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत विमे काढण्यात आले आहेत. करमाळा उमेद अभियानाच्या बीएमएम सुषमा बीचुकले, योगेश जगताप, चंद्रकांत माने आणि हनुमंत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे.



विमा दावा मंजूर होण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्राचे शाखा व्यवस्थापक अमोल फडके, उपव्यवस्थापक विजय शेंद्रे, राहुल कनकुंटला, जयेश सोनकुसरे, निलेश ओहोळ, प्रशांत रायचुरे आणि दत्तात्रय ससाणे यांनी प्रयत्न केले.

अल्प हप्त्यात मोठे विमा संरक्षण मिळत असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांनी प्रधानमंत्री सुरक्षा विमा व प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनांचा लाभ घ्यावा. कोणतीही महिला विमा संरक्षणापासून वंचित राहू नये, असे आवाहन कृषी सखी प्रियांका निलेश ओहोळ यांनी केले.

error: Content is protected !!