करमाळा पोलीस स्टेशनमध्ये अनोळखी व्यक्तीच्या मृत्यूची नोंद - नातेवाईकांचा शोध सुरू - Saptahik Sandesh

करमाळा पोलीस स्टेशनमध्ये अनोळखी व्यक्तीच्या मृत्यूची नोंद – नातेवाईकांचा शोध सुरू

करमाळा (संदेश प्रतिनिधी) – करमाळा-टेंभुर्णी रोडवरील शेलगाव (ता. करमाळा) येथे एक अनोळखी व्यक्ती जखमी आढळून आला होता व त्यानंतर उपचारा दरम्यान तो व्यक्ती मयत झाला असल्याची माहिती करमाळा पोलिसांनी माध्यमांना दिली.

याविषयी अधिक माहिती अशी की, २९ सप्टेंबर रोजी करमाळा-टेंभुर्णी रोडवर शेलगाव येथे अंदाजे ४० ते ५० वर्षे वयाचा व्यक्ती स्थानिकांना जखमी अवस्थेत आढळून आला होता. स्थानिकांनी ही माहिती करमाळा पोलिसांना कळवली व त्या व्यक्तीला जवळील रुग्णालयात दाखल केले. उपचारा दरम्यान २९ सप्टेंबर दिवशीच रात्री ८:१५ च्या सुमारास त्या व्यक्तीचे निधन झाले.

पोलिसांनी केलेल्या तपासात या मयत व्यक्तीचे नाव बिरामन गुप्ता (वय ४५ ते ५० वर्षे अंदाजे), रा. कन्हौली, खास देवारिया, उत्तर प्रदेश अंगात निळया रंगाचा शर्ट, त्यावर पांढरे रंगाचे रेषा, वर्ण गोरा, बांधा सडपाळ, निळया रंगाची पॅन्ट असे वर्णन आहे.

सदरील व्यक्तीच्या नातेवाईकांचा आम्ही शोध घेत असून कुणाला या व्यक्ती बाबत माहिती असेल तर करमाळा पोलीस ठाणे येथे कळवावे. अथवा फोन नंबर ०२१८२ २२०३३३ यावर किंवा तपासी अधिकारी यांच्या मोबाईल नंबर ९०४९६६०२३६ यावर कळवावे.

पी. एन. जगताप, पोलीस उपनिरीक्षक, करमाळा पोलीस स्टेशन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!