जमीन वहीवाटु देणार नाही असे म्हणत चौघांकडून एकास मारहाण - Saptahik Sandesh

जमीन वहीवाटु देणार नाही असे म्हणत चौघांकडून एकास मारहाण

करमाळा (संदेश प्रतिनिधी) – शेतजमीनीच्या वादातून चौघांनी शिवीगाळी करून एकास मारहाण केली असल्याची घटना वरकटणे (ता.करमाळा) येथे घडली आहे.

सचिन हरीदास देवकर रा.वरकटणे (ता.करमाळा जि. सोलापुर) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीत त्यांनी म्हटले की, माझी व माझा भाऊ आप्पा हरिदास देवकर याची शेती मौजे वरकटणे ता करमाळा हद्दीमध्ये शेजारी शेजारी असुन माझी व भाऊ आप्पा याचेत शेतीच्या कारणावरुन नेहमी वादविवाद होत आहेत. दि. २५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाच्या सुमारास मी आमचे शेतातुन काम करुन घरी येवुन बसलो असता थोड्या वेळाने माझा भाऊ आप्पा हरिदास देवकर हा माझे घरासमोर दारु पिउन येवुन मला म्हणाला कि, मी तुझ्या नावावरची जमीन तुला वहीवाटु देणार नाही, तुला काय करायचे ते करुन घे असे म्हणुन शिवीगाळी करु लागला. त्यामुळे मी घराबाहेर आलो तेव्हा घरासमोर 1) आप्पा हरिदास देवकर, 2) अरुणा आप्पा देवकर, 3) ऋषीकेश आप्पा देवकर, 4) तुषार आप्पा देवकर असे उभा होते. त्यावेळी मी भाऊ आप्पा यास तु मला शिवीगाळी का करतो असे विचारले असता तु मला विचारणारा कोण असे म्हणुन भाऊ आप्पा याने घरासमोर पडलेले लाकडी दांडके हातात घेवुन माझे डोक्यात मारुन मला जखमी केले. तसेच माझा पुतण्या ऋषीकेष याने तेथेच पडलेले दगड हातात घेवुन माझे डोक्यात मारुन मला जखमी केले तसेच अरुणा आप्पा देवकर व तुषार आप्पा देवकर यांनी लाथाबुक्याने मारहाण करुन शिवीगाळी दमदाटी केली.

त्यावेळी आमच्या भांडणाचे आवाजाना आमच्या गावातील धनंजय देवकर, अजित देवकर, भरत देवकर, पत्नी सोनाली यांनी आमचे भांडण सोडवासोडवी केली. त्यानंतर मी व पत्नी सोनाली आम्ही करमाळा पोलीस ठाण्यास तक्रार देण्यास आलो असता, पोलीसांनी मला करमाळा उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेतले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण साने हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!