कमलबाई सुराणा यांचे निधन
करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा : श्रीमती कमलबाई हिरालाल सुराणा (वय-९०) यांचे वृध्दपकाळाने नुकतेच पुणे येथे निधन झाले आहे. त्यांच्या मागे तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. डॉ. सुभाष सुराणा यांच्या त्या मातोश्री होत्या. ३ नोव्हेंबर पर्यंत त्या जेऊर येथे होत्या. त्यानंतर पुणे येथील सी.ए. सतीश सुराणा यांचेकडे दिवाळीनिमित्ताने गेल्या होत्या. दरम्यान त्यांचे दुसरे चिरंजीव डॉ. राजेंद्र सुराणा हे लंडन येथे असतात. ते सुध्दा दिवाळीच्या निमित्ताने पुणे येथे आले होते. त्यांची प्रकृती तशी उत्तम होती. अचानक त्यांचे निधन झाले. त्यांच्या आकस्मित जाण्याने सुराणा परिवारावर संकट कोसळले आहे. कमलबाई सुराणा यांचे निधनाची बातमी समजताच जेऊर येथील नागरीकांनी तसेच मेडिकल असोसिएशनने त्यांना श्रध्दांजली अर्पण केली आहे.