करमाळा तालुक्यात नव्याने नेमण्यात आलेल्या नोटरींचा करमाळा वकील संघाकडून सन्मान…
करमाळा/संदेश प्रतिनिधी :
करमाळा (ता.१६) : करमाळा तालुक्यात नव्याने भारत सरकारकडून नेमण्यात आलेल्या नोटरींचा सत्कार करण्यात आला, हा सत्कार करमाळा वकील संघाच्यावतीने करमाळा न्यायालयात करण्यात आला. याप्रसंगी करमाळा वकील संघाचे सर्व सदस्य उपस्थित होते.
करमाळा तालुक्यातील ॲड.रवींद्र बरडे, वकील संघाचे अध्यक्ष ॲड.डि.एम.सोनवणे, ॲड.अलीम पठाण, ॲड.योगेश शिंपी, ॲड.एम.डी.कांबळे, ॲड.नवनाथ राखुंडे,ॲड.अनिल कांबळे, ॲड.प्रवीण देवकर, ॲड.अजित विघ्ने, ॲड.सौ.मांगले-शिंगाडे यांची केंद्र शासनाच्या नोटरीपदी निवड करण्यात आली आहे.
या निवडीनंतर करमाळा वकील संघामध्ये या सर्वांचा एकत्रित सत्कार करण्यात आला, यावेळी ॲड.डॉ.बाबुराव हिरडे, ॲड.सविता शिंदे ॲड.राहुल सावंत, ॲड.बलवंत राऊत यांची भाषणे झाली. याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना ॲड.नवनाथ राखुंडे, ॲड.अजित विघ्ने, ॲड.दत्तात्रय सोनवणे, ॲड.शहानुर सय्यद यांची भाषणे झाली. यावेळी सचिव ॲड.विनोद चौधरी यांनी प्रास्ताविक केले. ॲड.सुहास मोरे यांनी आभार मानले. यावेळी नोटरी ॲड.शहानूर सय्यद तसेच ॲड.सचिन लोंढे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी वकील संघाचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.