रावगाव येथील राजीव गांधी सार्वजनिक वाचनालयात डॉ.आंबेडकर यांना अभिवादन.. -

रावगाव येथील राजीव गांधी सार्वजनिक वाचनालयात डॉ.आंबेडकर यांना अभिवादन..

0


करमाळा / संदेश प्रतिनिधी : भास्कर पवार…

करमाळा : रावगाव (ता.करमाळा) येथेराजीव गांधी सार्वजनिक वाचनालय महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त वाचनालयाच्या वतीने प्रतिमा पूजन सरपंच संदीप शेळके ,उपसरपंच ज्ञानेश्वर जाधव, माजी पी.एस.आय .हनुमंत केकान मेजर शहाजी ओहोळ ,यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील लिखित ग्रंथांचे प्रदर्शन वाचनालयाच्या वतीने भरण्यात आले होते या प्रदर्शनास शालेय विद्यार्थ्यांचा उदंड असा प्रतिसाद मिळाला यावेळी ठाणे येथील पीएसआय कांबळे यांनी भ्रमणध्वनी वरून ग्रामस्थांना महामानवाच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा संदेश पाठवला व मार्गदर्शन केले या कार्यक्रम प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य दादासाहेब पवार ,सुरेश फुंदे, कृषी अधिकारी भाऊसाहेब खाडे, बांधकाम मटेरियल व्यावसायिक गोपीनाथ सोलंकर शेठ ,प्रगतशील बागातदार नानासाहेब जाधव ,मुख्याध्यापक बबन पाटोळे ,महेंद्र शिंदे गुरुजी,विद्या गंभीर मॅडम,निर्मला पाटोळे मॅडम, महावीर कांबळे ,माजी सरपंच रामदास बाबर, गायक नितीन पवार, राहूल पवार, प्रकाश कांबळे तसेच ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.उपस्थितांचे आभार सचिव भास्कर पवार यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!