करमाळ्यात उद्या शरद पवारांची सभा - धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रचार सभेत माजी आमदार नारायण पाटील यांचा जाहीर प्रवेश.. -

करमाळ्यात उद्या शरद पवारांची सभा – धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रचार सभेत माजी आमदार नारायण पाटील यांचा जाहीर प्रवेश..

0

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : माढा लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रचारार्थ उद्या (ता.26) सकाळी दहा वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे उपस्थित राहणार आहेत, या प्रचार सभेत करमाळा तालुक्याचे माजी आमदार नारायण आबा पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटात जाहीर प्रवेश करणार आहेत, ही सभा करमाळा शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती मैदान करमाळा येथे होणार आहे.

या सभेसाठी करमाळा तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन महाविकास आघाडीच्यावतीने करण्यात आले आहे. या प्रचार सभेत करमाळा तालुक्याचे माजी आमदार नारायण आबा पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटात जाहीर प्रवेश करणार आहेत तसेच त्यांच्या सोबत जिल्हापरिषदेचे माजी अध्यक्ष, तसेच सदस्य, सरपंच, उपसरपंच, सोसायटीचे चेअरमन कार्यकर्ते तसेच माढा तालुक्यातील काही कार्यकर्ते यावेळी जाहीर प्रवेश करणार आहेत. या सभेसाठी खुद्द शरद पवार उपस्थित राहणार असल्याने या सभेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे, या सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. सध्या संपूर्ण करमाळा तालुक्याचे या सभेकडे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!