ॲड. लुणावत यांना दिलीप फौंडेशनचा राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार - Saptahik Sandesh

ॲड. लुणावत यांना दिलीप फौंडेशनचा राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार

0


करमाळा, ता.7:  करमाळा वकील संघाचे ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. सुखलाल लुणावत यांना बार्शी येथील दिलीप फौंडेशनचा राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार देऊन नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे.

हा पुरस्कार माजी न्यायमूर्ती  अंबादास जोशी यांचे हस्ते देण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थांनी  महाराष्ट्र- गोवा बार कौन्सिल चे माजी अध्यक्ष ॲड. मिलिंद  थोबाडे हे होते.

अ‍ॅड. लुणावत  यांनी करमाळा, सोलापूर, बार्शी आदी ठिकाणी गेल्या 48  वर्षापासून वकीली व्यवसाय केला आहे. वकीली बरोबरच त्यांचे सामाजिक कार्य महत्त्वाचे  आहे.या सर्व बाबीचा विचार करून  त्यांना हा पुरस्कार दिला आहे.
त्यांच्या या पुरस्काराबद्दल  करमाळा वकील संघाचे अध्यक्ष ॲड.  रविंद्र  बरडे, उपाध्यक्ष सुनील रोकडे, सचिव  विनोद चौधरी यांनी विशेष अभिनंदन  केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!