पराभवाने मी खचणार नाही – माझी लढाई सुरूच ठेवणार – प्रा.रामदास झोळ

0


करमाळा (दि.३०) – करमाळा विधानसभा मतदार संघात झालेल्या निवडणूकीत माझा पराभव झाला असला तरी मी खचणारा माणूस नाही. माझी लढाई अशीच पुढे सुरू राहणार आहे. माझ्या मागे तरुणांची फळी उभी आहे, असे प्रतिपादन रामदास झोळ यांनी केले. पुढील होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकी संदर्भात विचार विनीमय बैठक काल (दि.२९) करमाळा येथे पार पडली. यावेळी श्री.झोळ बोलत होते.

पुढे बोलताना ते म्हणाले की, तरुणांना रोजगार मिळवण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे. करमाळा तालुक्यात मुलींसाठी उच्च शिक्षणाची सोय करणार आहे. फाॅंउडेशनच्या माध्यमातून तालुक्याचा विकास करण्यासाठी कटिबध्द राहणार आहे. करमाळा तालुक्यातील प्रत्येक गावात झोळ फाउंडेशच्या शाखा काढून या शाखेच्या मदतीने समाजकार्य व राजकारण करणार असल्याचे प्रतिपादन रामदास झोळ यांनी केले.

विचार विनिमय बैठकीत कार्यकर्ते

या वेळी शेतकरी कामगार पक्षाचे दशरथ कांबळे, काॅंग्रेसचे जेष्ट नेते हरिभाउ मंगवडे, ओ,बी,सी सेल तालुकाध्यक्ष गफूर शेख तालुका उपाध्यक्ष आनंद झोळ सचिव माया ताई झोळ पोलीस मित्र संघटनेचे तालुकाध्यक्ष संभाजी शिंदे, वाशिंबेचे माजी सरपंच भगवान डोंबाळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र गोडगे जिल्हा युवा नेते गणेश मंगवडे तालुका उपाध्यक्ष सुहास काळे संजय जगताप भिमराव तनपुरे, श्रीकांत साखरे पाटिल तसेच करमाळा माढा तालुक्यातील कार्यकतें उपस्थित होते.

या वेळी दशरथ कांबळे म्हणाले की, करमाळा तालुक्यात रामदास झोळ फाउंडेशनच्या शाखा काढून गावा,गावात कार्यकत्याचे संघटनेला पाठबळ देणार आहे. करमाळा तालुक्यातील राजकारणात सक्रिय सहभाग घेउन करमाळा तालुक्याचा विकास करणार आहे. नवीन वर्षामध्ये संकल्प करून गाव तिथे फाॅंउडेशनच्या शाखा काढण्यासाठी कार्यकत्यानी कामाला लागावे. येणारा काळ आपलाच आहे.

प्रस्ताविक श्रीकांत साखरे पाटील यांनी केले. सूत्रसंचालन गोपीनाथ पाटील यांनी केले तर आभार गणेश मंगवडे यानी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!