आंबेडकरवादी चळवळीकडून राजमाता जिजाऊ यांना अभिवादन

करमाळा(दि.१२) : करमाळा शहरातील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे डॉ. आंबेडकरवादी चळवळ व सामाजिक संघटना यांच्या वतीने रविवारी (दि.१२) राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. एल. यु. कांबळे, सुरेश आहेर, महेश इरकर, सनि कांबळे, अजहर जमादार यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून हे अभिवादन करण्यात आले. यावेळी डॉ. आंबेडकरवादी चळवळीचे कार्यकर्ते उपस्थित होते.




