केम येथे छावा चित्रपट मोफत दाखविण्यात येणार

केम(संजय जाधव): जिल्हा परिषद सदस्य दिलीप दादा तळेकर यांच्या वाढदिवसानिमित्त आज (दि.४) केम येथे सायंकाळी ६:३० वाजता संभाजी महाराजांवरील छावा हा चित्रपट मोठ्या एलईडी स्क्रीनवर दाखवण्यात येणार आहे.
सध्या छत्रपती संभाजी महाराजाच्या जीवनावर आधारित छावा चित्रपटाने महाराष्टात झंझावत निर्माण केला आहे. संभाजी महाराजाचा ऐतिहासिक छावा चित्रपटामुळे त्यांचा इतिहास सर्वाना समजावा या उद्देशाने मराठी चित्रपट छावा हा केम येथे जाणता राजा क्लाबच्या वतीने सांयकाळी ६:३०वा श्री उत्तरेश्वर हायस्कूल मध्ये दाखविण्यात येणार आहे. हा चित्रपट पाहण्याचा लाभ घेण्याचे आवाहान संयोजकांनी केले आहे.






