अजितदादा पवार विद्यालयास संगणक संच व ध्वनी प्रणाली भेट  -

अजितदादा पवार विद्यालयास संगणक संच व ध्वनी प्रणाली भेट 

0

करमाळा (दि. १५): वडशिवणे (ता. करमाळा) येथील अजितदादा पवार विद्यालयात शनिवारी (दि. १४ जून) रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी आणि जगदाळे क्लासेस, पुणे यांच्या माजी विद्यार्थ्यांच्या पुढाकाराने पाच संगणक संच व ध्वनी प्रणाली शाळेला भेट स्वरूपात देण्यात आली.

यावेळी शाळेच्यावतीने रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीच्या सदस्यांचा सन्मान करण्यात आला. आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे संस्थापक मारुती पारखे होते. विविध मान्यवरांनी आपापले मनोगत व्यक्त केले.

रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीचे अध्यक्ष गोविंद जगदाळे,  आपल्या भाषणात म्हणाले की, “प्रत्येकाने देव, देश आणि धर्मासाठी जीवन जगले पाहिजे. आजच्या काळात जुन्या मूल्यांचा आणि संस्कारांचा आदर राखणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातच सत्य, परोपकार व कृतज्ञतेचे धडे आत्मसात केले, तर समाज व देश उन्नती साधेल,”


या कार्यक्रमाच्या वेळी रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीचे अध्यक्ष गोविंद जगदाळे यांनी त्यांचे वडील ह.भ.प पुंडलिक नामदेव जगदाळे यांच्या स्मरणार्थ इयत्ता दहावी मध्ये प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रदान केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नागेश मोरे यांनी केले तर आभार मुख्याध्यापक भीमराव भोसले यांनी मानले.

यावेळी संचालक गोरख पारखे, मुख्याध्यापक भीमराव भोसले, धनंजय मोरे, सरपंच विशाल जगदाळे, वसंत भामरे, रो. जयश्री भामरे, रो. गणेश बोरा, रो. गोविंद चितोडकर, रो. सुशांक भूमकर, रो. वसंत ढवळे, रो. निलेश सोनवणे, सेक्रेटरी सुभाष वाल्हेकर, रो. आबा जाधव, अभिषेक वाल्हेकर, माजी सरपंच रामचंद्र व्हरे, गोरख जगदाळे, दत्तात्रय साळुंखे, आबासाहेब कदम, पोपट कोडलिंगे, हिराचंद ओस्तवाल, महादेव जगदाळे, विठ्ठल जगदाळे, गोरख तळेकर, आकाश आगलावे, कालिदास तळेकर, संतोष कवडे, बाळासाहेब वनवे, शांतीलाल कदम, नागनाथ पोकळे, नवनाथ कुंभार, रघुनाथ सावंत, कुबेर कोडलिंगे आदी मान्यवर उपस्थित होते.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!