सा.ना.जगताप मुली नं. 1 शाळेत उत्साही वातावरणात प्रवेशोत्सव साजरा -

सा.ना.जगताप मुली नं. 1 शाळेत उत्साही वातावरणात प्रवेशोत्सव साजरा

0

करमाळा, ता. १६: नगर परिषद, करमाळा येथील पीएम श्री – साधनाबाई नामदेवराव जगताप प्राथमिक मुलींची शाळा नं. १ मध्ये नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात प्रवेशोत्सव कार्यक्रमाने उत्साहात झाली. नवख्या विद्यार्थिनींचे गुलाबपुष्प, चॉकलेट, फुगे आणि पुष्पवृष्टीने स्वागत करत आनंदमय वातावरण तयार करण्यात आले.

शाळेने विद्यार्थिनींच्या स्वागतासाठी आकर्षक रांगोळी, कार्टून आकृती, फुगे आणि सेल्फी पॉईंटद्वारे सजावट केली होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी मा. अनिल बनसोडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक मा. अतुल (भैय्या) फंड, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. निर्मला फंड, उपाध्यक्षा सौ. आम्रपाली कांबळे, शिक्षणतज्ज्ञ सौ. माधुरी पवार, सौ. शितल माने, सौ. दिपाली बोकन, सौ. प्रियंका भुसारे आणि श्री. सारंग परदेशी आदी उपस्थित होते.

या प्रवेशोत्सवाच्या निमित्ताने सर्व नवख्या विद्यार्थिनींना मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश तसेच शूज-सॉक्स वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस मुख्याध्यापक श्री. दयानंद चौधरी यांनी शाळेच्या गुणवत्तेची माहिती देताना मागील वर्षीची प्रगती आणि यश सांगितले.

या वेळी एक उल्लेखनीय उपक्रम म्हणून शाळेच्या माजी विद्यार्थिनी गायत्री वीर हिच्या स्मरणार्थ तिचे वडील, प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. चंद्रकांत वीर यांनी विविध शिष्यवृत्ती स्वरूपात गौरव केला.

राज्य गुणवत्ता यादीतील: आराध्या बरीदे, मधुरा बागल, अनन्या पवार, श्रावणी खराडे, तन्मयी चोपडे, शरयू फरतडे यांना प्रत्येकी ₹५००

जिल्हा गुणवत्ता यादीतील: राजमुद्रा सुरवसे, अंशिका पाटील, समृद्धी साडेकर यांनाही प्रत्येकी ₹५००

केंद्र गुणवत्ता यादीतील: काव्यांजली करचे, ओवी माहुले, पूर्वा घोलप, आरोही घुमरे, आराध्या फंड, भाग्यश्री घोलप, संघर्षा कांबळे, आरोही खरात, मनवा उकिरडे, गौरवी जगदाळे, आरसीन बागवान यांना प्रत्येकी ₹३०० रोख रक्कम प्रदान करण्यात आली.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीम. संध्या शिंदे मॅडम यांनी तर आभारप्रदर्शन सौ. मोनिका चौधरी मॅडम यांनी केले.

या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील श्री. रमेश नामदे, श्री. निलेश धर्माधिकारी, श्री. निलेश भुसारे, सौ. सुवर्णा वेळापुरे, सौ. सुनिता क्षीरसागर, श्रीम. तृप्ती बेडकुते, श्रीम. भाग्यश्री पिसे, श्रीम. योगिनी चवरे आदी शिक्षकांनी विशेष मेहनत घेतली.

पालकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती आणि शाळेच्या पहिल्याच दिवशी सर्व इयत्तांतील विद्यार्थिनींची लक्षणीय उपस्थिती हे या उपक्रमाचे यश अधोरेखित करत होते.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!