कै. नामदेवराव जगताप उर्दू शाळेत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत -

कै. नामदेवराव जगताप उर्दू शाळेत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

0

करमाळा (दि. १६): कै. नामदेवराव जगताप उर्दू शाळेत आज शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी नवागत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. नव्याने इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत माजी नगरसेवक संजय सावंत, फारुक जमादार, रविंद्र कांबळे, दिपक सुपेकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मजहर नालबंद, मुख्याध्यापक जुबेर जनवाडकर व अन्य मान्यवरांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन करण्यात आले.

या प्रसंगी पालक, शिक्षक व शाळा प्रशासनाचे अधिकारी यांची उपस्थिती लक्षणीय होती.

कै. नामदेवराव जगताप उर्दू शाळा ही शंभर वर्षांहून अधिक काळाची परंपरा लाभलेली शाळा असून, येथे पहिली ते दहावीपर्यंतचे वर्ग कार्यरत आहेत. चालू वर्षी शाळेच्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी शंभर टक्के निकाल मिळवून संस्थेची परंपरा कायम ठेवली आहे.

कार्यक्रमास प्रशासन अधिकारी अनिल बनसोडे, लिपिक शिवदास कोकाटे, तसेच पालक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या समारोपाला मुख्याध्यापक जुबेर जनवाडकर यांनी सर्वांचे आभार मानले.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!