उमरड मध्ये विद्यार्थ्यांची सजवलेल्या ट्रॅक्टरमधून मिरवणूक काढत स्वागत

करमाळा (दि. १८): जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उमरड येथे शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नवागत चिमुकल्यांचे स्वागत पारंपरिक आणि आनंददायी वातावरणात करण्यात आले. यावेळी पहिली वर्गात नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची सजवलेल्या ट्रॅक्टरमधून गावातून मिरवणूक काढण्यात आली. गुलाब पुष्प देऊन आणि पायाचे पहिले ठसे कागदावर उमटवून त्यांचे औक्षण करत स्वागत करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात मा. आमदार नारायण आबा पाटील व गटशिक्षणाधिकारी मा. जयवंत नलवडे यांच्या शुभहस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. यानंतर नवागत विद्यार्थ्यांना ओळखपत्रे, मोफत पाठ्यपुस्तके आणि गणवेशाचे वाटप करण्यात आले.


प्रास्ताविक श्री. अनिल यादव यांनी केले. गटशिक्षणाधिकारी जयवंत नलवडे यांनी शाळेने मोठ्या उत्साहाने हा उपक्रम राबवल्याबद्दल शाळा व पालकांचे कौतुक केले. आमदार नारायण आबा पाटील यांनी “मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” अभियानांतर्गत सलग दोन वर्ष शाळेने मिळवलेल्या पुरस्काराबद्दल गौरवोद्गार काढले आणि शाळा व्यवस्थापन समितीचे तसेच ग्रामस्थांचे अभिनंदन केले.

कार्यक्रमास सरपंच प्रमोद बदे, मकाई साखर कारखान्याचे संचालक बापूसाहेब चोरमले, आदिनाथ साखर कारखान्याचे संचालक राजाभाऊ कदम, माजी सरपंच संदीप मारकड, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय काका कोठावळे, उपाध्यक्ष रवींद्र गिरी, जनार्दन तात्या मारकड, चांगदेव चौधरी, माजी अध्यक्ष समाधान मारकड, अण्णा पडवळे, कचरू चौधरी, रसूल शेख, फिरोज पठाण व अनेक पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन मुख्याध्यापक अंकुश अमृळे, दिलीप भोसले, संदीप ढाकणे, बापूसाहेब भोसले, मुकुंद राऊत, श्रीमती मेघना साळुंखे यांनी केले. सूत्रसंचालन अनिल यादव यांनी केले तर आभार प्रदर्शन बापूसाहेब चोरमले यांनी मानले.




